Margashirsh 2023 : इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने असतात, त्याचप्रमाणे हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र, आषाढ, ज्येष्ठ, सावन, भाद्रपद, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने असतात. मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. काही ठिकाणी याला अघानचा महिना देखील म्हणतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 13 डिसेंबर पासून होत आहे. तर पहिला गुरूवार 14 डिसेंबर दिवशी आहे



मार्गशीर्ष मासारंभ आजपासून


मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 12 डिसेंबरच्या रात्री 6.24 वाजता अमावस्या संपल्यानंतर झाली आहे. मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत.  


मार्गशीर्ष गुरूवार 2023 व्रत तारीख


पहिला गुरूवार - 14 डिसेंबर


दुसरा गुरूवार - 21 डिसेंबर


तिसरा गुरूवार - 28 डिसेंबर


चौथा गुरूवार - 4 जानेवारी


 


मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे महत्त्व


मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे. असे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले असते. या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केले असेल. अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही, देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो.


 


महालक्ष्मीचं व्रत कसे करतात?


मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची परंपरा आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार-वेणी अर्पण करून दर गुरूवारी पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते.


 


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : 2024 मध्ये शनि-केतूमुळे बनणार षडाष्टक योग; 'या' 4 राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, मिळणार नोकरीच्या ऑफर्स