Shadashtak Yog impact on Zodiac Sign : ज्योतिष शास्त्रामध्ये केतू हा छाया ग्रह मानला जातो आणि शनि (Shani) हा न्यायाचा देव मानला जातो. केतू दीड वर्षात आपली राशी बदलतो. 2024 मध्ये केतू कन्या राशीत असणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता आणि आता 2024 मध्ये देखील केतू याच राशीत राहील. शनिदेव सध्या कुंभ राशीत आहेत आणि 2024 चं पूर्ण वर्ष शनि याच राशीत राहणार आहे.


शनि आणि केतूच्या या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होईल. 2024 मध्ये सर्व 12 राशींवर या योगाचा मोठा प्रभाव पडेल. हा योग काहींसाठी शुभ किंवा काहींसाठी अशुभ असू शकतो. यापैकी 4 राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अतिशय शुभ असणार आहे. या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. एकामागून एक मोठ्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला उच्च पदाची आणि जास्त पगाराची नोकरी मिळू शकते. जीवनातील सर्व समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. 2024 मध्ये शनि-केतू कोणत्या राशींचे भाग्य उजळवणार? जाणून घेऊया.


षडाष्टक योग या राशींसाठी ठरणार शुभ


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना शनि-केतू मिळून भरपूर लाभ देतील. या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप लकी ठरणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. करिअरमधील मोठं यश तुम्हाला खूप सन्मान देईल. 


सिंह रास (Leo)


2024 मध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी शनि आणि केतूची स्थिती खूप फायदेशीर ठरेल. या लोकांच्या आयुष्यातील जुन्या समस्या एक-एक करून संपतील. पैशाची आवक वाढेल. संपत्तीत वाढ होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. 


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांना 2024 हे वर्ष एकामागून एक यश देणारं आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरपूर यश मिळेल. घरात आनंदाचं वातावरण राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.  


तूळ रास (Libra)


शनि आणि केतू यांनी तयार केलेला षडाष्टक योग 2024 मध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. पदोन्नती मिळू शकते. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात सुख-समृद्धी, समृद्धी नांदेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल