Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. 15 जानेवारीला संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जाणार आहे. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण अगदी मोठ्या उत्सहात साजरा करतात. मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का परिधान केले जातात? या दिवशी काळ्या रंगाचं नेमकं महत्त्व काय? हे फार क्वचितच लोकांना माहीत आहे. यासाठीच आज या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

  


मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण जरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असले तरी यामध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजा काळ्या रंगाचे कपडे. नवविवाहीत वधू असेल तर तिला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात. 


मकर संक्रातीला काळ्या रंगाचे कपड का परिधान करतात? 


पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं. तर, मकर संक्रांती हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. अशा वेळी जास्त उष्णता शोषून घेणारे काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान केले जातात. हे यामागचं वैज्ञानिक कारण आहे. कारण काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त ऊब असते. त्यामुळे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मकर संक्रांतीला तिळाचं देखील महत्त्व यासाठीच आहे कारण तीळ हे उष्ण असतात. शरीराला उष्णता मिळावी आणि शरीर उष्ण राहावं यासाठी संक्रांतील तिळगुळ वाटले जातात. 


मकर संक्रांतीचं महत्त्व 


या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिनाला ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. यासाठी मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.


महत्त्वाच्या बातम्या : 


Makar sankranti 2024 : हिवाळ्यात गरम पदार्थांचं सेवन फायदेशीर तितकंच धोक्याचं; शरीरावर कोणते परिणाम होतात?