Maharishi Valmiki Jayanti 2023 : रामायणाचे लेखक महर्षि वाल्मिकी यांचा जन्मदिवस दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 2023 मध्ये वाल्मिकी जयंती आज म्हणजेच शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी साजरी होत आहे. शरद पौर्णिमा हा सण देखील या दिवशी साजरा केला जातो, जो देवी लक्ष्मीचा प्रकट दिन देखील आहे.
महर्षी वाल्मिकींचे बालपण
पौराणिक कथेनुसार, महर्षी वाल्मिकींचे मूळ नाव रत्नाकर आणि त्यांच्या वडिलांचे नाव प्रचेता, ब्रह्माजींचे मानस पुत्र होते, याबाबत एक प्रसिद्ध कथा आहे. लहानपणी एका भिल्ल महिलेने त्यांचे अपहरण केले आणि ते भिल्ल समाजात वाढले. भिल्ल कुटुंबातील लोक जंगलाच्या वाटेने जाणाऱ्यांना लुटायचे. रत्नाकर म्हणजेच वाल्याच्या कुटुंबासोबत दरोडे, लुटमारीचे प्रकार सुरू केले.
अशा रीतीने वाल्याचे महर्षी वाल्मिकीमध्ये रूपांतर झाले
पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. योगायोगाने एके दिवशी नारदमुनी वाल्या राहत होते त्याच वाटेने जंगलातून जात होते. दरोडेखोर रत्नाकरने नारद मुनींना पकडले. या घटनेनंतर वाल्या कोळ्याच्या जीवनात असा बदल झाला की, ते एका डाकूतून महर्षी झाले. खरे तर वाल्मिकीने नारद मुनींना कैद केले तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या पापकर्माचे तुमचे कुटुंबीय भागीदार होतील का? हे फक्त तुमच्या कुटुंबाला विचारा
कुटुंबातील प्रत्येकजण त्याच्या पापात समान भागीदार होईल असा वाल्मीकीचा विश्वास होता, परंतु जेव्हा सर्वांनी सांगितले की, रत्नाकरच्या पापाचा भागीदार केवळ तोच असेल, तेव्हा त्यांचा मोहभंग झाला आणि महर्षि प्रचेताचे गुण आणि रक्त त्यांच्या आत सळसळू लागले, त्यावेळी त्यांनी नारदमुनींना मोक्षाचा उपाय विचारला.
वाल्मिकींना हा मंत्र नारद मुनींकडून मिळाला
नारद मुनींनी रत्नाकरला राम नावाचा मंत्र दिला. आयुष्यभर माराम्हणणाऱ्या रत्नाकरच्या तोंडून रामाचे नाव निघत नव्हते. नारदमुनी म्हणाले, तुम्ही 'मरा-मरा' म्हणा, या मार्गाने तुम्हाला राम मिळेल. हा मंत्र म्हणत असताना रत्नाकर रामात इतका तल्लीन झाला की तो केव्हा तपश्चर्येत मग्न झाला, त्याच्या अंगावर वाळवी केव्हा तयार झाली हे त्यांनाच कळलेच नाही. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले, त्यांच्या अंगावर वाळवी पाहून त्यांनी रत्नाकर वाल्मिकी हे नाव ठेवले आणि ते या नावाने प्रसिद्ध झाले. ब्रह्माजींनी त्यांना रामायण रचण्याची प्रेरणा दिली.
अशा प्रकारे वाल्मिकींनी रामायण रचले
रत्नाकर रामायण कसे रचणार हे माहीत नव्हते. सकाळी नदीच्या काठावर पोहोचले, तेव्हा कावळ्या पक्ष्यांची जोडी प्रेम करताना दिसली. त्याचवेळी एका शिकारीने नर कावळ्याला बाण मारून मारले. यामुळे महर्षि इतके दुखावले गेले की त्यांच्या मुखातून अचानक एक शाप बाहेर पडला - मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः। यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥' म्हणजे ज्या दुष्ट शिकारीने प्रेमात पक्षी मारला, त्याला कधीही शांती मिळणार नाही.
शाप दिल्यानंतर महर्षींना आश्चर्य वाटू लागले की त्यांच्या तोंडातून काय बाहेर पडले. त्यावेळी नारद मुनी प्रकट झाले आणि त्यांना सांगितले की हा त्यांचा पहिला श्लोक आहे ज्यातून ते रामायण रचणार आहेत. महर्षी वाल्मिकींनी रामायण रचले. त्यांच्या आश्रमातच देवी सीतेने लव आणि कुश या दोन मुलांना जन्म दिला. त्यांचा आश्रम आजही नैनितालच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये आहे. जो सीतावनी म्हणून ओळखला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा
Chandra Grahan 2023 : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण! भारतात कधी आणि कुठे पाहू शकता? सुतक काळ जाणून घ्या