Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या तिथीपासूनच शुभ कार्यक्रम सुरू होतात. देवउठनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा अडथळे येत असतील तर या दिवशी काही उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया लग्नात होणारा विलंब कसा दूर करायचा? उपाय जाणून घ्या.
भगवान विष्णूंचा सर्वात आवडता दिवस म्हणजे एकादशी
शास्त्रानुसार, भगवान विष्णूंचा सर्वात आवडता दिवस म्हणजे एकादशी होय, त्यामुळे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अधिक महत्त्वाची ठरते. धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्यातील या एकादशी तिथीला भगवान विष्णू पाच महिन्यांनी आपल्या योगनिद्रेतून जागे होतात. म्हणून याला देवउठनी किंवा कार्तिकी एकादशी म्हणतात.
आजपासून शुभ कार्याला सुरूवात
2023 मध्ये देवउठनी एकादशी गुरुवारी, 23 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू पाच महिन्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतात. वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा लग्नाला उशीर होण्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, तर देवउठनी एकादशीचा दिवस उपायासाठी उत्तम आहे.
-जर अविवाहित मुलगा-मुलीला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर त्यांनीही देवउठनी एकादशीच्या दिवशी हे उपाय करून अडथळ्यांमधून बाहेर पडू शकता.
-अविवाहित मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी.
-याशिवाय भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण केल्याने लग्न लवकर होण्याची शक्यता वाढते.
-भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी केशर, पिवळे चंदन किंवा हळदीचा टिळा लावावा.
-जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवउठनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.
-पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. जल अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
-जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर देवउठनी एकादशीच्या दिवशी हे काम अवश्य करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Goddess Lakshmi : देवी लक्ष्मी सतत श्री विष्णूंचे पाय का दाबते? आर्थिक लाभाशी संबंधित एक रहस्य, पौराणिक कथा जाणून घ्या