Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव हे शिवाचे रौद्र रुप; 'अशी' आहे या अवताराची जन्मकथा
Kaal Bhairav Jayanti : काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरी केली जाते. या तिथीत भगवान शिवाचे रौद्र रुप कालभैरवाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस कालभैरवाची जयंती म्हणून साजरा केला जातो.
Kaal Bhairav Jayanti 2023: भगवान शिवाच्या रौद्र किंवा उग्र रूपात काल भैरव देवाची पूजा केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष किंवा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरवाची पूजा करुन जयंती साजरी केली जाते. कालभैरवाचा जन्म क्रोधातून झाला, म्हणून तो शंकराचा उग्र अवतार मानला जातो. या शिवरूपाची पूजा केल्याने भय आणि शत्रूपासून मुक्ती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते.
या वर्षी काल भैरव जयंती मंगळवार, 5 डिसेंबर 2023 रोजी आली आहे. कालभैरवाची उपासना केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. कालभैरव हे अफाट शक्तींचे देवता (God) आहेत, असे शास्त्रात सांगितले आहे, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीतीही दूर होते. पण तुम्हाला माहित आहे का की, कालभैरवचा जन्म कसा झाला आणि त्याचा भगवान शिवाशी काय संबंध आहे? जाणून घेऊया.
काल भैरवची जन्मकथा (Kaal Bhairav Katha in Marathi)
कालभैरवाच्या जन्माशी संबंधित पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात 'तिघांमध्ये श्रेष्ठ कोण?' यावरून वाद झाला. वाद आणि चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. मग एक सभा बोलावून सर्व देवांना विचारण्यात आले, 'तिघांमध्ये श्रेष्ठ कोण?' सर्व देवतांनी आपापले विचार मांडले. यानंतर झालेल्या निष्कर्षाने भगवान विष्णू आणि शिव प्रसन्न झाले, परंतु ब्रह्मदेव समाधानी झाले नाहीत.
ब्रम्हदेव रागाने भगवान शंकराबद्दल वाईट बोलले. सर्व देवतांच्या स्तुतीनंतर ब्रह्मदेवाकडून अपमानास्पद शब्द ऐकल्याने झालेला अपमान भगवान शिवांना सहन झाला नाही आणि त्यांनाही राग आला आणि या रागातून कालभैरवांचा जन्म झाला. भगवान शिवाच्या या उग्र अवताराला महाकालेश्वर असेही म्हणतात. भगवान शंकराचे हे उग्र रूप पाहून सर्वजण घाबरले आणि सर्व देवतांनी त्यांना शांत राहण्याची विनंती केली.
पण रागाच्या भरात कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाच मुखांपैकी एक मुख कापले. या घटनेनंतर ब्रह्मदेवाला चार मुखे आहेत, असे सांगितले जाते. पण या आधी त्याला पाच चेहरे होते. ब्रह्मदेवाचे मस्तक कापल्यामुळे कालभैरवावरही ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप केले गेले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने शिवाच्या या उग्र अवताराची क्षमा मागितली, त्यानंतर ते शांत झाले. मात्र, ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापामुळे कालभैरवाला शिक्षा भोगावी लागली आणि अनेक वर्षे भिकाऱ्याच्या रूपात पृथ्वीवर भटकावे लागले. शेवटी त्याची शिक्षा वाराणसीत संपली. म्हणूनच कालभैरवाला दंडपाणी हे नाव देखील पडले.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब