Covid-19 JN.1 Precautions : कोरोना (Cororna) महामारीने पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे. या व्हायरसच्या केसेसमध्ये काही काळापासून घट झाली असली, तरी अलीकडेच त्याच्या नवीन व्हेरिएंटने लोकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. खरंतर, गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोना JN.1 चे रुग्ण आढळून येत आहेत. भारतातील अनेक राज्यांतून त्याची केसेस नोंदवली गेली आहेत. अशा स्थितीत आता आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोनाचे हे नवीन सब-व्हेरिएंट म्हणून घोषित केले आहे. अशा परिस्थितीत नववर्षाच्या स्वागतापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांची काळजी घेणं आणि त्याचा प्रसार रोखणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते सांगणार आहोत.


सोशल डिस्टन्सिंग


कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अशा परिस्थितीत, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, सामाजिक अंतर राखण्यास सांगा. 


मास्कचा वापर करा  


कोणत्याही प्रकारचा व्हायरस टाळण्यासाठी मास्क वापरणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना मास्क घालण्याची सवय लावा. विशेषतः गर्दीच्या किंवा बंद ठिकाणी मास्क वापरण्याची खात्री करा. 


वारंवार हात धुणे


तुमच्या मुलांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगा आणि त्यांना किमान 20 सेकंद साबण आणि पाण्याने वारंवार हात धुण्यास प्रोत्साहित करा. तसेच मुलांना त्यांच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला वारंवार हात लावण्यास सांगू नका. 


लसीकरण करा 


कोरोनापासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या या लढ्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, मुलांसाठी लसीकरणाशी संबंधित सर्व नवीन मार्गदर्शक तत्त्वांची माहिती ठेवा. 


योग्य वेंटिलेशनची व्यवस्था करा 


घरात किंवा जिथे मुलं खूप राहतात त्या ठिकाणी योग्य वेंटिलेशनची व्यवस्था करा. योग्य वेंटिलेशन व्हायरसचा धोका कमी करते. शक्य असल्यास, घरातील वेंटिलेशन सुधारण्यासाठी खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवा.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Covid-19 : टेन्शन वाढलं! एका दिवसात 529 नवे कोरोनाबाधित, JN.1 व्हेरियंटचे 110 रुग्ण; दिल्लीत पहिला रुग्ण सापडला