Hartalika 2023 : यंदा 18 सप्टेंबर 2023 रोजी हरतालिका तृतीया आहे. या दिवशी भगवान शंकराने (Lord Shankar) पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. विवाहित महिलांसाठी हे व्रत महत्त्वाचे आहे. जाणून घ्या हरतालिका तृतीयेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत (Ganesh Chaturthi 2023)
विवाहित, अविवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचे व्रत
हरतालिका तृतीयाचे व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते. अविवाहित मुलीही चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात.
हरतालिका शुभ मुहूर्त
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.08 ते 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12.39 पर्यंत असेल. या दिवशी प्रदोष काल पूजेचा पहिला शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.23 ते 06.47 पर्यंत आहे. ज्या महिला सकाळी हरितालिका तृतीयेचे व्रत करतात, त्यांच्यासाठी 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 06.07 ते 08.34 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. हरतालिका तृतीयाची पूजा रात्रीच्या चार प्रहरात करण्याची प्रथा आहे. हा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी 24 तासांनी संपतो. या दिवशी काही महिला निर्जळी उपवासही करतात.
ग्रह आणि नक्षत्रांचा अप्रतिम संयोग
हरतालिका तृतीयेला ग्रह आणि नक्षत्रांचा अप्रतिम संयोग होत आहे. या दिवशी रवी आणि इंद्र योगात पूजा होणार असून चित्रा आणि स्वाती नक्षत्रांचा योग बनत आहे. अशा स्थितीत उपवास करणाऱ्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते. अशी लोकांची धारणा आहे.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि इच्छित वर मिळण्यासाठी..
पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला दर्शन दिले. तेव्हा भगवान शंकराने तिला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि इच्छित वर मिळण्यासाठी दरवर्षी हरतालिका व्रत करू लागल्या. हरतालिका तृतीयेच्या दिवशी फुलांनी बनवलेला फुलोरा बांधला जातो. त्याच्या खाली मातीचे शंकर आणि पार्वतीच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. या दिवशी रात्री जागरण करून शिव-पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या पद्धतीने पूजा केल्याने विवाहित स्त्रीला नेहमी भाग्यवान राहण्याचा आशीर्वाद मिळतो, तसेच विवाहित मुलींना चांगला जोडीदार मिळतो.
हरतालिका तृतीयेची पूजा कशी करावी?
हरतालिका तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास ठेवल्याने तसेच हरतालिकेची कथा ऐकल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात. वैवाहिक जीवनात शांती राहावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला उपवास करतात. या दिवशी स्त्रिया शिवाची सोळा अलंकारांनी पूजा करतात.
-पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग ठेवावे.
-त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा.
-आता कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलश मध्ये पाणी भरा
-त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला.
-मूर्तींचा विधीवत अभिषेक करावा
-त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात
संबंधित बातम्या