मुंबई : यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग तयार होत आहे, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे. पंचांगानुसार, यामुळे यंदा श्री गणेशाची मनोभावे पूजा करणाऱ्यांना लाभ नक्कीच मिळेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता संपेल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असेल. ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी तीन राशींवर गणपती बाप्पाची कृपा राहील. या तीन राशींच्या लोकांना धनलाभ होण्याचाही योग आहे. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहे.
मेष (Aries)
यंदाची गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात सुख मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीच्या विचारात असाल तर, हा अतिशय अनुकूल वेळ असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा, तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करेल.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुभ योग असून तुम्हालांही श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात दुप्पट नफा मिळेल. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाची साधनं वाढून नफा होईल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊन दीर्घकाळ स्थिती सुधारेल.
गणेश चतुर्थी 2023 कधी आहे? (Ganesh Chaturthi 2023 Date)
19 सप्टेंबर 2023, मंगळवार
गणेश चतुर्थी तिथी (Ganesh Chaturthi 2023)
चतुर्थी आरंभ तिथी : 18 सप्टेंबर 2023, दुपारी 12:39 वाजता
चतुर्थी समाप्ती तिथी : 19 सप्टेंबर 2023, दुपारी 1:43 वाजता
गणेश पूजा मुहूर्त (Ganesh Puja 2023 Muhurat)
19 सप्टेंबर 2023, सकाळी 11:00 वाजेपासून दुपारी 1:26 वाजेपर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :