Bhau Beej 2023 : भाऊबीज (Bhaubeej) हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवाळीतला (Diwali 2023) चौथा आणि शेवटचा दिवस असतो. भाऊबीज (Bhaubeej) हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला सांगता होते. या सणाला हिंदीत भाईदूज (Bhai Dooj) असं म्हणतात.
भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीजेचा सण 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात.
अशी आहे आख्यायिका :
भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथेच जेवावे अशी प्रथा आहे. ह्यावेळी बहिणीने भावाला ओवाळावे. भावाने तिला ओवाळणी घालावी. बहिणीनेही भावाला एखादी भेटवस्तू द्यावी, जेवणात भावाच्या आवडीचे पदार्थ करावेत. सख्खी बहीण नसलेल्यांनी चुलत, मावस, मामे, आत्ते अशा दूरच्या नात्यातील बहिणीकडे जाऊन ही भाऊबीज साजरी करावी.
पूजेची परंपरा
भाऊबीजेच्या दिवशी बहीण सकाळी आंघोळ करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते, आणि त्यावर पाच विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवते. नंतर भावाच्या हातावर धांगा बांधून पाणी शिंपडत भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करते. काही ठिकाणी, बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावत त्याला औक्षण करते, आणि भावाच्या मनगटावर धागा बांधते. मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते. आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. आपल्या सोयीने आपल्या बहिणीच्या हातनं ओवाळून घ्यायचं आहे. तिच्या हातचं खायचं आहे. आपल्या सोयीने आपल्या बहिणीच्या हातनं ओवाळून घ्यायचं आहे. तिच्या हातचं खायचं आहे. भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांच्या माळा, मिठाई, धागा, केळी असावी. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :