Diwali Padwa 2023 : दिवाळी (Diwali 2023) सणात मुख्य आकर्षण असतं ते दिवाळी पाडव्याचं (Diwali Padwa). अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असं या दिवसाचं वर्णन करतात. यावर्षी 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. या दिवशी घर तसेच कामाच्या ठिकाणी दारापुढे सुबक रांगोळी काढली जाते. तेलाच्या दिव्यांनी परिसर सजविला जातो. आकर्षक रोषणाई केली जाते. नवे कपडे परिधान केले जातात. तसेच, या दिवसाची आणखी एक परंपरा आहे ती कोणती ते जाणून घ्या.
दिवाळी पाडव्याची परंपरा
या दिवशी सकाळी माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना तसेच नवऱ्याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून त्यांचे औक्षण केले जाते. आपला वैवाहिक संसार उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहावा यासाठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो. नवविवाहित जोडप्यांसाठी दिवाळीचा पहिला पाडवा खूप खास असतो. या दिवशी नव विवाहित जोडप्यांकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण करतात आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देण्यात येतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना तसेच नवऱ्याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून त्यांचे औक्षण केले जाते.
बलिप्रतिप्रदेची पूजा
दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा (Balipratipada 2022) पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.
हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करायची प्रथा आहे. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :