Pregnancy Tips : आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची भावना असते. स्त्रीच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. गरोदरपणात (Pregnancy) स्त्रीला तिच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच, या काळात गरोदर महिलांना अनेक लोकांकडून, नातेवाईकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मिळू लागतात. बाळाच्या पोषणाचा विचार करून गर्भवती महिलांनी आपल्या आहारात जास्तीत जास्त आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा.
या काळात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम युक्त आहार घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गरोदर महिलांनाही माखणा खाण्याचा सल्ला दिला जातो. मखना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण गरोदरपणात हे खाल्ल्याने अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया गरोदरपणात मखनाचे फायदे.
चांगली झोप मिळते
गर्भधारणे दरम्यान महिलांना अनेकदा झोप येत नाही. अशा परिस्थितीत मखाना खाल्ल्याने चांगली आणि आरामदायी झोप येण्यास मदत होते. तसेच, हार्मोन्समधील बदलांमुळे, तणावासारख्या परिस्थिती देखील कमी होतात. मखानामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराच्या कार्याचे अशा प्रकारे नियमन करतात की जेव्हा तुम्हाला झोपायची इच्छा असते तेव्हा तुम्हाला चांगली झोप लागते.
रक्तदाब नियंत्रित होतो
गर्भधारणेदरम्यान महिलांना सामान्यतः बीपीची समस्या असते. अशा परिस्थितीत मखानाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. मखानामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रित होते
गरोदरपणात (Pregnancy) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मखाना मदत करतो. मखानामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर भरपूर असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतात. स्नॅकच्या वेळी तुम्ही हे खाऊ शकता.
मुलाच्या विकासासाठी उपयुक्त
गरोदरपणात (Pregnancy) मखाना खाल्ल्याने मुलाच्या विकासात खूप मदत होते. यामुळेच हे लहान मुलांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण मुलांची हाडे मजबूत करण्यास मदत करते. अशा प्रकारे गरोदर महिलांनी आपल्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :