Pregnancy Tips : प्रत्येक महिलेच्या आयुष्यात गर्भधारणेचा (Pregnancy Tips) काळ हा अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा असतो. या काळात महिलांनी आपला आहार (Food), योग्य औषधं आणि नियमित व्यायाम (Excercise) करणं गरजेचं आहे. कारण या दरम्यान महिलेच्या गर्भात एक नवीन जीव निर्माण होत असतो. ज्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते. मात्र, या दरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या शारिरीक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. यातील सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). 


गर्भधारणे दरम्यान महिलांना बद्धकोष्ठतेचा सामना नेमका कोणत्या कारणांमुळे करावा लागतो? आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होणं ही फार सामान्य बाब आहे. तुमच्या शरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे हा त्रास होऊ लागतो. तसेच, तुमच्या शरीरातील फायबर, पाण्याची कमतरता आणि नियमित व्यायाम न केल्याने हा त्रास महिलांना होतो. 


बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात. 


भरपूर पाणी प्या 


बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळविण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी तुम्हाला दिवसातून साधारण 2 ते 3 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. 


योग्य आहार घ्या 


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेत प्रत्येक महिलेने आपल्या आहाराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. तसेच, तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल. 


फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा 


तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने तुमचं पोट साफ होण्यास मदत होते. रोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, महिलांनी आपल्या आहारात पालेभाज्या,फळं, कडधान्य आणि डाळींचा समावेश करावा. यामुळे तुमच्य गर्भातील जीवाला देखील योग्य पोषण मिळण्यास मदत होईल. 


शारिरीक हालचाल करा 


तुम्हाला जर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर यासाठी शारिरीक हालचाल करणं गरजेचं आहे. तसेच, जर तुम्ही कोणताही व्यायाम करणार असाल तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Tips : नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीनंतर किती दिवसांनी व्यायाम सुरू करायचा? तज्ञांकडून योग्य वेळ जाणून घ्या