Pregnancy Tips : गर्भधारणेचा (Pregnancy) काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी (Women) आनंदाचा आणि अविस्मरणीय असा क्षण असतो. पण, या दरम्यान महिनांला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बहुतेक महिलांचे वजन गर्भधारणेदरम्यान वाढते. प्रसूतीनंतर महिलांना विश्रांती घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. पण प्रसूतीनंतर (Delivery) जर तुम्ही योग्य आहार आणि व्यायामाचे पालन केले नाही तर तुमचे वजन दिवसेंदिवस वाढू शकते.


अशा परिस्थितीत बहुतेक महिलांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की प्रसूतीनंतर किती वेळाने त्यांनी व्यायामाला सुरुवात करावी, जेणेकरून त्यांचे वजन नियंत्रणात ठेवता येईल. याबाबत आरोग्य तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


वर्कआउट केव्हा सुरू करायचा?


डॉ. शीतल कौशिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, पारस हेल्थ, उदयपूर सांगतात की, नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीनंतर किमान 6 आठवडे व्यायाम करायला हवा. या काळात कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली टाळल्या पाहिजेत. नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीनंतर शरीर खूप कमकुवत होते. तसेच, शरीरात अशक्तपणा जाणवतो. त्याचा परिणाम महिलेच्या पोट, पाठ आणि नितंबांवरही दिसून येतो. अशा स्थितीत किमान 40 ते 45 दिवसांनी शरीर हळूहळू मजबूत होते. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करावा. प्रसूतीच्या दोन आठवड्यांनंतर हलके व्यायाम (Excersise) केले जाऊ शकतात.


हलका व्यायाम फायदेशीर आहे


रीसा IVF च्या वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. रीका बक्षी सांगतात की, तुम्ही दोन आठवड्यांच्या आत वॉकिंग करू शकता. तसेच, व्यायाम सुरू करण्यापूर्वी, तुम्ही एखाद्या आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य वेळी व्यायाम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असाल तर तुम्ही हलके योगासने आणि प्राणायाम देखील करू शकता. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही डिलीव्हरीनंतर हे साधे आणि सोपे व्यायाम केले तर हळूहळू तुमच्या शरीराला देखील पूर्वावस्थेत येण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : मोबाईलचा अति वापर तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी घातक; काय आहे मायोपिया? हे कसं टाळाल? वाचा सविस्तर