Covid-19 : कोरोनाने (Covid19) जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यातच नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) अनेकांची चिंता वाढवली आहे. या धोकादायक आजारामुळे भारतासह संपूर्ण जगात तिसऱ्या लाटेची स्थिती आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. Omicronची लक्षणे सौम्य असल्याचे सांगितले जात असले तरी या विषाणूमध्ये वेगाने पसरण्याची आणि कोणालाही सहज पकडण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. कोरोनाची लक्षणे जितक्या वेगाने बदलत आहेत तितक्याच वेगाने कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत. या प्रकाराची अशी अनेक लक्षणे आहेत जी सामान्य लक्षणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. अशा परिस्थितीत, कोरोना झाला की नाही यासठीचाचणी करणे आवश्यक आहे. पण काही लक्षणे आहेत ज्यावरून हे ओळखले जाऊ शकते की ही कोरोनाचीच लक्षणे आहेत.


घसा खवखवणे :


जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर समजा की तो कोरोना आहे. कारण घसा खवखवणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरातच थांबले पाहिजे. आणि त्वरित तपासणी केली पाहिजे. यासोबतच मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांचेही पालन करावे.


कोरोना व्हायरसची सामान्य लक्षणे  


कोरोना व्हायरसच्या मुख्य लक्षणांमध्ये सतत खोकला येणे, वास न येणे किंवा चव कमी होणे आणि ताप यांचा समावेश होतो. त्याच वेळी, काही लोकांना नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा आणि भूक न लागणे यांसारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha