Health Tips : शिंका येणं हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच शिंका येतात. काही लोक शिंका येण्यापासून लाजत नाहीत. तर, काहींना चारचौघांसमोर शिंका द्यायला लाज वाटते. आणि त्यामुळे ते शिंका थांबविण्याचा प्रयत्न करतात. शिंका थांबवण्याचा हा प्रयत्न जीवघेणाही ठरू शकतो. तुम्हाला कदाचित या गोष्टी निरर्थक वाटतील. पण, शिंका येणं बंद केल्याने एक व्यक्तीचा बळी देखील गेला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
शिंका येणे थांबल्याने घसा फुटला
बीएमजे केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या कागदपत्रांनुसार, 34 वर्षीय व्यक्तीला शिंका थांबवल्याने आपला जीव गमवावा लागला. ब्रिटनमधील या व्यक्तीच्या घशात तीव्र वेदना आणि सूज येऊ लागली. काही दिवसांतच त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्रासलेली व्यक्ती उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली. जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या समस्येचे कारण ऐकले तेव्हा प्रथमच त्यांचा विश्वास बसेना. डॉक्टरांनी सांगितले की, शिंका येणे बंद केल्याने सर्व दाब घशात गेला. त्यामुळे घशातील मऊ उती फुटतात. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते.
शिंक येणं धोकादायक का आहे?
जेव्हा जेव्हा शिंक येते तेव्हा नाकातून जोरदार हवा बाहेर येते. आता शिंका येणे बंद केले तर हवेचा दाब बाहेर जाण्याऐवजी आत वळतो. ज्याचा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो. शिंकण्याद्वारे बाहेर पडणाऱ्या हवेचा दाब खूप जास्त असतो. कानातून बाहेर पडल्यास कानाचा पडदाही फाटू शकतो. या दाबामुळे डोळे, नाक, कान यांच्या रक्तवाहिन्याही फुटू शकतात. त्याचा परिणाम अधिक गंभीर झाला तर जीव गमवावा लागण्याची भीतीही कायम आहे. म्हणूनच शिंकणे थांबवण्याची चूक कधीही करू नका.
अनेकजण कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी, ट्रेनमध्ये शिंका घेण्यास टाळतात. सुरुवातीला तुम्हाला या संदर्भात काहीही जाणलणार नाही. मात्र, जसजसा हा त्रास वाढत जाईल तसतसे तुम्हाला या त्रासाचं गांभीर्य कळेल. ही परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये यासाठी वेळेत कोणताही संभ्रम मनात न बाळगता शिंका द्यायला सुरुवात करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :