Navratri 2024 Decoration: आदिमाया अंबाबाई.. साऱ्या दुनियेची आई...! खरंच ती अवघ्या विश्वाची आई आहे, आणि आई आपल्या घरी येणार तर तिचं स्वागतही खासंच असायला हवं... यंदाची नवरात्रही खास असणार आहे. यंदा 2024 मध्ये शारदीय नवरात्रीचा उत्सव हा 3 ऑक्टोबरपासून साजरा केला जाईल. हिंदू सणांमध्ये याला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अशा स्थितीत देवीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी देवीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी म्हणजेच पूजास्थळी विशिष्ट पद्धतीने सजावट करतात. तसेच घर आणि देवीची सजावटही केली जाते. जर तुम्हीही देवीची मूर्ती तुमच्या घरी आणत असाल, किंवा घटस्थापना करताय, तसेच तिचे पूजास्थळ सजवण्यासाठी अनोखे मार्ग शोधत असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही देवीच्या आवडत्या वस्तूंनी पूजास्थळ आणि घटस्थापनेची जागा कशी सजवू शकता.
देवीचे पूजास्थळ केळीने सजवा
देवीचे पूजास्थळ सजवण्यासाठी तुम्ही केळी वापरू शकता. केळीची पाने गोळा करा आणि देवीच्या बसण्याच्या जागेच्या मागे ठेवा. तसेच आता काठावर ठेवा आणि बांधा. यानंतर, आपण त्यावर फुलांच्या लांब माळा लटकवून सजावट पूर्ण करू शकता.
आंब्याच्या पानांपासून तोरण बनवा
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आंब्याच्या पानांनी सजावट करणे शुभ मानले जाते. नवरात्रीच्या दिवशी आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण बांधून तुम्ही देवीचे पूजास्थळ सजवू शकता. तुम्ही केळीची पाने आणि झेंडूच्या फुलांनी घट देखील सजवू शकता. तसेच प्रवेशद्वार रंगीबेरंगी फुलांच्या कमानी किंवा माळांनी सजवा.
झेंडूच्या फुलांनी सजवा
देवीच्या पूजेचे ठिकाण सजवण्यासाठी तुम्ही झेंडूच्या फुलांचाही वापर करू शकता. त्यासाठी आधी पूजेचे ठिकाण निश्चित करा. आता साडीचा उपयोग करून मागच्या बाजूला सजवा आणि घट्ट बांधा. त्याचप्रमाणे साडीला तिन्ही बाजूंनी पिन लावा. आता तुम्ही पिनच्या मदतीने फुलांच्या लांब माळा बनवून त्यांना साडीवर ठेवून खाली लटकवू शकता. सजावट स्थिर ठेवायची असेल तर ताज्या फुलांऐवजी कागदापासून बनवलेली फुले वापरू शकता. पूजेचे ठिकाण सजवण्यासाठी रंगीबेरंगी कागदाची फुलं बनवा.
पूजेचे टेबल जवाने सजवा
देवीच्या पूजेमध्ये जवाचे विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत तुम्ही या शुभ मुहूर्तावर जवाने सजवू शकता. यासाठी प्लास्टिकच्या ग्लासमध्ये माती भरून त्यात जवाच्या बिया पेराव्यात. आता तुम्ही ते सभोवताली ठेवून सजवू शकता. याशिवाय सुपारीची पानेही वापरू शकता.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: 'जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबालाही घाम फुटला!' दुर्गा देवीचे एक अनोखे मंदिर, रंजक आख्यायिका वाचून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )