Navratri 2023 : देशभरात नवरात्रौत्सव (Navratri 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. या काळात अनेक लोकांचे नऊ दिवस उपवास सुरु आहेत. या उपवासात अनेकजण फक्त फळं आणि ड्रायफ्रूट्सचं सेवन करतात. तसेच, नऊ दिवसांच्या या उपवासात गहू, तांदूळ आणि ओट्स, मांसाहारी अन्न, शेंगा, फास्ट फूड, जंक फूड, साखर यांसारखे पदार्थ खाणं टाळतात. काही लोक पिठाची खीर, फळे, ड्राय फ्रूट्स (Dry Fruits) आणि बिया खातात. संशोधनानुसार ड्राय फ्रूट्स सुपर फूडपेक्षा कमी नाहीत. हे नवरात्रीत सर्वाधिक खाल्ले जातात. ड्राय फ्रूट्स हे जीवनसत्त्वे, फायटोकेमिकल्स, कॅरोटीनोइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या अनेक बायोएक्टिव्हमध्ये समृद्ध आहे.


ड्राय फ्रूट्स भरपूर प्रमाणात पोषक असतात


आयुर्वेद ही एक प्राचीन औषधी पद्धत आहे. ड्राय फ्रूट्सचे फायदे आयुर्वेदिक दृष्टीकोनातून समजून घेणं गरजेचं आहे. ड्राय फ्रूट्स हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस मानले जाते. जे खाल्ल्यानंतर दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. तसेच, जर एनर्जी लो झाली तर अशा वेळी देखील ड्राय फ्रूट्सचं सेवन केलं जातं. असेही मानले जाते की कोरड्या फळांचे सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन राखण्यास मदत होते. ड्राय फ्रूट्समध्ये फायबरचं प्रमाण सर्वात जास्त असते. जे पचनास मदत करते आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य सुधारते. 


आयुर्वेदानुसार ड्राय फ्रूट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो


न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार सुक्या मेव्यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यामुळे हृदयविकार आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होऊ शकतो. अंजीर आणि खजूर यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.


कोणते ड्राय फ्रूट आरोग्यासाठी चांगले आहेत?


ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शारीरिक शांती मिळते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. अक्रोड आणि बदाम यांसारख्या ड्राय फ्रूट्सचं सेवन केल्याने ते शरीरासाठी चांगले मानले जातात. तसेच, यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. यासाठी उपवासात ड्राय फ्रूट्सचं सेवन फायदेशीर मानले जाते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी