Navratri 2022 : नवरात्रीचा (Navratri 2022) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 26 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्री उत्सवात देवीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे. या दरम्यान पंडालमध्ये दुर्गा माँची पूजा केली जाते. तसेच, व्रतवैकल्ये केली जातात. तसेच, या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो गरबाही नवरात्रीत खेळला जातो. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. अगदी गरबा खेळण्यासाठीही ते जातात. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही. चला तर जाणून घेऊयात नवरात्री आणि गरब्याचं विशेष नातं.
नवरात्रीत गरबा का खेळला जातो?
सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. माते अंबेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला लोक 'गरबा' (Garba) म्हणून ओळखले जाते. माँ अंबे यांना हे नृत्य खूप आवडते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मातेची स्थापना केल्यानंतर श्रद्धेने गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असे देखील मानले जाते.
गरब्याचे पारंपारिक महत्त्व
पारंपारिकपणे मातीच्या भांड्याभोवती दिवा लावून गरबा केला जातो, ज्याला 'गर्भ दीप' म्हणतात. हे एक प्रतीकात्मक आहे. नर्तक या मातीच्या भांड्यात किंवा घागरीभोवती वर्तुळात फिरतात आणि हात आणि पायांनी गोलाकार हालचाल करतात. हा हावभाव जीवनाच्या चक्राचे प्रतीक देखील मानला जातो. जो जीवनापासून मृत्यूपर्यंत पुनर्जन्मापर्यंत प्रगती करतो. मातीचे भांडे किंवा गार्बो हे गर्भाचे प्रतीक आहे.
असे मानले जाते की, अंबा माता (अंबे माँ) ही एक स्त्री आणि जगाची रक्षक आहे. ती आपल्या मुलांचे बाह्य जगाच्या क्रोधापासून संरक्षण करते आणि प्रत्येक आईप्रमाणेच आपल्या मुलांसाठी उभी राहते. आतील प्रकाश हे गर्भातील बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, विशेषतः मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठी नवरात्रीत गरबा खेळण्याला विशेष महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या :