नागपूरः आगामी महानगरपालिका निवडणूकीसाठी कामाला लागा. आता फक्त तीन महिने हातात आहे तर कुठलेही विलंब न करता आपल्या प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचा. नागरिकांच्या समस्या समजून घ्या. तुमच्या परिसरातील मुद्दे समजून ते सोडविण्यासाठी व्हिजन घेऊन मतदारापर्यंत पोहोचा, मतदार साध देतील. असे मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आजपासून पाच दिवस विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु झालेल्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच सोमवारी ते चंद्रपूर दौऱ्यावर असणार आहे. यानंतर अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. त्यांचं नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.


कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश


राज्यातील सत्तांतरानंतर राज ठाकरे यांच्या भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांसोबत भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या विस्तार करण्यासाठी मनसेने विदर्भाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथील महानगरपालिका तसेच इतर निवडणूकांसाठी संघटनात्मक बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच फक्त पदाधिकारीच नव्हे तर कार्यकर्त्यांशीही ठाकरे स्वतः संवाद साधत आहेत. आतापर्यंत मनसेला विदर्भात हवी तेवढी लोकप्रियता मिळाली नसली तरी राज ठाकरेंच्या या दौऱ्याने कार्यकर्ते चार्ज होऊन जोमाने कामाला लागती अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


प्राप्त माहितीनुसार राज ठाकरे आज, रविवारी रात्री फुटाळा येथे सुरु असलेल्या फाऊंटेन शो भेट देतील अशी माहिती आहेत. यासोबतच सोमवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती आहे.


विदर्भातील तीन जिल्ह्यांवर लक्ष


रविवारी सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठका केल्या. यात शहरातील सहा विधानसभा आणि ग्रामीणमधील सहा अशा बारा विधान सभेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. उद्या, सोमवारी 19  सप्टेंबर - गाठीभेटी आणि पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते चंद्रपूरला रवाना होतील.  चंद्रपुरात त्यांचं जंगी स्वागत होईल आणि विभागवार बैठका होतील. त्यानंतर 20, 21  सप्टेंबर- अमरावतीत विभागनिहाय बैठका होतील. तर 22 सप्टेंबर रोजी ते मुंबईत परतणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


MNS Nagpur : विदर्भातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची गोची


Raj Thackeray: राज ठाकरेंचं आजपासून 'मिशन विदर्भ';  5 दिवस विदर्भ दौरा, नागपुरात जंगी स्वागत