Falguni Pathak : नवरात्रोत्सव (Navratri 2022) जसजसा जवळ येऊ लागला आहे. तशी या उत्सवाबद्दल, परंपरेबद्दल आणि गाण्यांबद्दल उत्सुकता अधिक वाढली आहे. नवरात्रोत्सवात तमाम तरूणाईला आकर्षित करणारा भाग म्हणजेच गरबा (Garba). आणि याच गरब्यातील गाणी गाऊन सर्वांचं मनोरंजन करणारी, जिच्या गाण्यावर ठुमके मारल्याशिवाय गरबा अपूर्णच अशी 'गरबा क्वीन' म्हणजेच फाल्गुनी पाठक (Falguni Pathak). फाल्गुनी एक अशी गायिका आहे जिने आपल्या संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आणि आपले नाव सातासमुद्रापार पोहोचविले.


फाल्गुनी पाठकचा जन्म 12 मार्च, 1964 रोजी मुंबईत झाला. फाल्गुनीने तिचे महाविद्यालयीन शिक्षण मिसेस एम.एम.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बी.कॉम.ची पदवी घेतली. तुम्ही फिल्मी गाण्यांवर कितीही नाचलात तरी भक्तिगीतांवर नाचण्याची कला जरा अवघडच वाटते. पण, फाल्गुनी पाठकच्या भक्तिगीतांवर नाचण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूॅं में, यांसारखी अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून स्टेज परफॉर्मन्स देणाऱ्या फाल्गुनी पाठकविषयी काही मनोरंजक माहिती जाणून घ्या. 


1998 मध्ये पहिला अल्बम लॉन्च 


फाल्गुनीने तिच्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये केली होती. तिचा पहिला अल्बम 1998 मध्ये लाँच झाला होता. यानंतर फाल्गुनीने अगदी असंख्य गाणी गायली. फाल्गुनीने फक्त भारतातच नाही तर परदेशातही नाव कमावले. विशेष म्हणजे, फाल्गुनीने भारतात आपल्या सुराच्या ताकदीने इतके फॅन फॉलोअर्स वाढवले ​​की, तिने चक्क बॉलिवूडचा रेकॉर्ड मोडला.


1994 मध्ये, फाल्गुनी पाठक म्हणजेच ​​गरबा क्वीनने 'ता-थैया' नावाचा स्टेज बँड सुरू केला. या बॅंडचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही परफॉर्मन्स होतात. फाल्गुनी पाठकने 1998 मध्ये युनिव्हर्सल म्युझिकसह 'याद पिया की आने लगी' या तिच्या पहिल्या अल्बमद्वारे नवीन प्रसिद्धी मिळवली. फाल्गुनीची बहुतेक गाणी प्रेमावर आधारित आहेत.  नवरात्रीमध्ये गायलेली भक्तिगीतेही फार प्रसिद्ध आहेत. 


फाल्गुनी पाठकची काही प्रसिद्ध गाणी : 



  • ओ पिया - 2001

  • अर्पण - 2008

  • मेरी चुनर उड उड जाये - 2000

  • ये कैसा जादू किया - 2002

  • दिल झूम झूम नाचे - 2004

  • मैने पायल है छनकाई - 1999

  • याद पिया की आने लगी - 1998


'वासलडी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


गेली 33 वर्ष सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही गरबा क्वीन पुन्हा एकदा आपल्या मंजुळ आवाजाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच फाल्गुनीचे 'वासलडी' (Vasaladi) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांसाठी थांबलेला गरबा आता पुन्हा फाल्गुनीच्या आवाजाने गुंजणार आहे यात शंका नाही. 


महत्वाच्या बातम्या :