Nagpanchami Rangoli : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या दिवशी भगवान शिवाचे अलंकार म्हणजेच नागदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी ही पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, यंदा नागपंचमीचा सण 8 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार अनेक महिला आता नोकरी-कामानिमित्त घराबाहेर जाऊ लागल्या आहेत. तसेच काही महिलांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वेळ मिळत नाही, तर या महिलांसाठी आज आम्ही झटपट, कमी वेळेत होणाऱ्या रांगोळ्याच्या नवीन डिझाईन्स सांगत आहोत. या रांगोळ्या तुम्ही घराबाहेर काढल्या तर, तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही, तसेच कमी वेळेत पटकन होईल..
हेही वाचा>>>
Nagpanchami Recipe : यंदाची नागपंचमी खास...पदार्थही स्पेशलच! कोणत्या राज्यात कोणते पदार्थ केले जातात? नागदेवाला प्रसन्न करणारे नैवेद्य जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )