Nagpanchami Recipe : नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकरासोबत नाग देवतेची पूजा करून आणि घरातील विविध पदार्थ खाऊन हा दिवस आणखी खास बनवला जातो. दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्प दोष नष्ट होतो अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नागपंचमीला काय खावं? नागदेवतेला प्रसन्न करणारे कोणते प्रसाद आणि पदार्थ आहेत? नागपंचमीला देशाच्या विविध भागात काय काय तयारी केली जाते? जाणून घ्या..



नागपंचमीला महाराष्ट्रात कोणता खास पदार्थ केला जातो?


श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. कानोळे ही महाराष्ट्राची एक अस्सल, पारंपारिक पाककृती आहे. ही एक नागपंचमी स्पेशल रेसिपी. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी कापणी न करणे, भाजणे किंवा कढई न वापरणे अशी परंपरा लोक पाळतात. अशात ही रेसिपी वेगळी आहे, पण सहज करता येते. ही रेसिपी तुम्ही घरी करून पाहू शकता. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापांचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि खीर हा नैवेद्याचा मुख्य पदार्थ आहे. कानोळे हे गव्हाचं पीठ, गूळ आणि तेल घालून तयार केलं जातं, हे पीठ लटून सर्व त्रिकोणी आकाराचे कानोळे बनवून कुकरमध्ये वाफवून घेतले जाते .


 




 


नागपंचमीला बिहारमध्ये कोणता खास पदार्थ केला जातो?


नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी पोळी बनवली जात नाही. या दिवशी लोखंडी भांडी किंवा तव्याचा वापर करू नये असे मानले जाते. अशावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नागपंचमीच्या दिवशी मालपुआ बनवला जातो, जो खूप चविष्ट असतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातील घराघरात देशी पद्धतीने मालपुआ बनवून नागदेवतेला अर्पण केला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणूनही खाल्ला जातो.





नागपंचमीला मध्य प्रदेशात कोणता खास पदार्थ केला जातो?


नागपंचमीच्या दिवशी मध्य प्रदेशात नागदेवतेला खीर पुरी अर्पण केली जाते. या दिवशी तांदळाची खीर आणि गव्हाच्या पीठाची पुरी केली जाते. खीरमध्ये भरपूर मावा असल्याने त्याची चव वाढते.





राजस्थानमध्ये नागपंचमीला कोणता खास पदार्थ केला जातो?


दाल बाटी राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहे. नागपंचमीला राजस्थानमध्ये दाल बाटी बनवण्याची परंपरा आहे. फक्त नागपंचमीला हा नैवेद्य दाखवला जातो. त्यात तुरीची डाळ खास शिजवली जाते. ज्यामध्ये ओवा आणि जिरे पिठात मिसळले जाते आणि कडक पीठ मळले जाते. या बाट्या ओव्हनमध्ये किंवा मातीच्या भांड्यात शिजवल्या जातात.


 




 


 


हेही वाचा>>>


Shravan Recipe : तुमचाही श्रावणात उपवास आहे? चविष्ट आणि आरोग्यदायी उपवासाचा हा पदार्थ नक्की खा..अगदी झटपट होणारी रेसिपी


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )