Zika Virus: मुसळधार पाऊस आणि पुरानंतर पुणे शहरात झिकाची (Zika Virus) रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे, बुधवारी एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सहा गर्भवती महिला आहेत. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


पुण्यात झिका विषाणूचा (Zika Virus) धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुधवारीही शहरात संसर्गाचे 8 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) सादर केलेल्या अहवालानुसार यामध्ये 7 गर्भवती महिलांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जूनपासून आतापर्यंत सुमारे 81 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, परंतु झिका संसर्गाव्यतिरिक्त ते सर्व इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते.


एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एकूण संक्रमित लोकांमध्ये 26 गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे, परंतु सुदैवाने त्यापैकी बहुतेक आता निरोगी आहेत आणि त्यांना बरे वाटत आहे, या वर्षी 20 जून रोजी शहरात झिका विषाणू (Zika Virus) संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टरची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ही बाब समोर आली. यानंतर त्यांच्या  15
वर्षांच्या मुलीलाही संसर्ग झाल्याची पुष्टी झाली.


शहरातील कोणत्या भागात किती रूग्ण?


शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक 16 रुग्ण आहेत. एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात 14 रुग्ण, खराडी 10, घोले रस्ता 7, सुखसागरनगर 6, पाषाण, मुंढवा प्रत्येकी 5, आंबेगाव बुद्रुक, कळस प्रत्येकी 3, लोहगाव, धनकवडी, कोरेगाव पार्क, वानवडी प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे. एकूण 73  रुग्णांपैकी 32 गर्भवती आहेत. आधी झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना झिका विषाणूसह इतर व्याधी होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू 


आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण या रुग्णांना हृदयविकार आणि यकृताचे आजारही होते, त्यामुळे त्यांची प्रकृती 68 ते 78 वर्षांच्या दरम्यान होती. 


गर्भवती महिलांना जास्त धोका 


झिका (Zika Virus) मुख्यतः गर्भवती महिलांना प्रभावित करतो, झिका विषाणू गर्भावर परिणाम करू शकतो. या विषाणूमुळे गर्भाच्या मेंदूचा पूर्ण विकास होत नाही. तसेच, झिका व्हायरसमध्ये एक आरएनए जीनोम आढळतो, ज्यामुळे त्यात उत्परिवर्तन जमा करण्याची अधिक क्षमता असते. याशिवाय, बाळाच्या जन्माच्या वेळी देखील त्याची लक्षणे दिसू शकतात. इतर काही लक्षणे दिसू शकतात जसे की मेंदूच्या विकासाचा अभाव, खराब दृष्टी यावरतीही परिणाम होण्याची शक्यता असते.