Nagpanchami Recipe : हिंदू धर्मात नागपंचमी सणाला अत्यंत महत्त्व आहे. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण आहे. शास्त्रानुसार या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. आज 9 ऑगस्ट नागपंचमी साजरी केली जात आहे. नागपंचमीच्या दिवशी भारतात सर्वत्र विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नागपंचमीला सात्विक अन्न खाण्याचीही परंपरा आहे. ज्यामुळे आज आपण सात्त्विक पदार्थांचा समावेश असलेली खास थाळी पाहणार आहोत. ज्यामधील पदार्थांची रेसिपी अगदी सोपी आहे, या थाळीमध्ये गोड शेवया, मटार पुलाव, बटाटा टोमॅटोची भाजी, कुरकुरीत कचोरी, उकडलेला हरभरा, बनवण्यात आला आहे.
बटाटा टोमॅटोची भाजी - साहित्य
250 ग्रॅम उकडलेले बटाटे
4 मोठे टोमॅटो
आवश्यकतेनुसार कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
1 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
कचोरी - साहित्य
250 ग्रॅम पीठ
1 वाटी रवा
आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ
1 टीस्पून कसुरी मेथी
पुलाव - साहित्य
250 ग्रॅम पुलाव तांदूळ
1 टीस्पून पुलाव मसाला
1 टीस्पून जिरे
1 तमालपत्र
100 ग्रॅम मटार
गोड शेवया - साहित्य
200 ग्रॅम बारीक शेवया
1 लिटर दूध
200 ग्रॅम साखर
आवश्यकतेनुसार ड्राय फ्रूट्स
50 ग्रॅम उकडलेले हरभरा गहू
पदार्थ बनवताना महत्त्वाच्या सूचना
कचोरी बनवण्यासाठी पिठात कचोरी मसाला आणि रवा, थोडं तेल आणि मीठ घालून मळून घ्या. छोट्या पुऱ्या करा
पुलावासाठी तांदूळ तासभर भिजत ठेवा, गरम पाण्यात मीठ घालून भात शिजवून घ्या, नंतर उकडलेले वाटाणे घाला, पुलाव मसाला, तमालपत्र घालून घ्या
कढईत तूप टाका, शेवया भाजून घ्या, दूध घालून शिजवा, साखर आणि थोडी वेलची पूड घाला. त्यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स घालून सजवा.
उकडलेले गहू, हरभरे, जिरे आणि मीठ घालून भाजून घ्या.
कुकरमध्ये तेल टाका. गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिरवी मिरची घाला. आता त्यात चिरलेला उकडलेला बटाटा घाला. आता त्यात टोमॅटो, मीठ, हळद मिरची पावडर घालून चांगले परतून घ्या. थोडे पाणी घालून एक शिट्टी घेऊन हिरवी कोथींबीर घाला.
आता तुमची नागपंचमी स्पेशल थाळी तयार आहे.
हेही वाचा>>>
Nagpanchami Recipe : यंदाची नागपंचमी खास...पदार्थही स्पेशलच! कोणत्या राज्यात कोणते पदार्थ केले जातात? नागदेवाला प्रसन्न करणारे नैवेद्य जाणून घ्या..
Nagpanchami Rangoli : झटपट अन् सुरेख! नागपंचमीला सोप्या रांगोळीने सजवा घर, सर्वांकडून होईल कौतुक! 'या' रांगोळी डिझाईन्स पाहाच
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )