Mother's Day 2024 Wishes : प्रत्येकाच्या आयुष्यात आई नेहमीच खास असते. म्हणूनच ती पहिली गुरू, पहिली मैत्रीण आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला दुखापत किंवा वेदना होतात तेव्हा आपल्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे आई. तिच्या मनात प्रत्येक मुलाबद्दल समान प्रेम आहे. ती मुलांना कधीही उपाशी झोपू देत नाही, स्वतः उठते आणि उठण्यापूर्वी त्यांची सर्व कामे पूर्ण करते. स्वतःला विसरून मुलांसाठी कसे जगायचे हे आईला माहीत असते. त्यामुळेच तुमच्या आईचे प्रेम आणि समर्पण लक्षात ठेवा. या मातृदिनी तिला प्रेमळ संदेश पाठवा. तुम्हालाही तुमच्या लाडक्या आईला मेसेजद्वारे मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत. पाहूयात...


 


‘देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुला निर्माण केलंय आई
आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि
वात्सल्याची जननी आहे.
तुझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 



 
आई तू म्हणजे अशी सावली आहे
जी नेहमी माझ्या सोबत असते,
जी उजेडातही आणि अंधारातही पुढे असते..
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत’
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



प्रेमाची सावली म्हणजे आपली आई..
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई..
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई


स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई.
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..!!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 


जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


 
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितीदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
 
डोळे मिटून प्रेम करते,
ती प्रेयसी …..
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
ती मैत्रीण ……
डोळे वटारून प्रेम करते,
ती पत्नी ……
आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते,
ती फक्त आई …..
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
 
तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


 


 


हेही वाचा>>>


Travel : 'मदर्स डे' च्या दिवशी आईचा दिवस करा Special! पुण्यातील 'या' 3 ठिकाणांना भेट द्या, भरभरून मिळेल आशीर्वाद


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )