Vastu Tips For Good Health : वास्तुशी संबंधित छोट्या-छोट्या चुकांमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वास्तू दोषामुळे अनेकदा घरावर संकटं येतात, कधी-कधी मन अस्वस्थ होतं. वास्तूशी संबंधित चुकांमुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. कधी-कधी कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद होतात. आरोग्याशी संबंधित समस्याही कायम राहते.
वास्तू दोषामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटत नाही. तुम्हाला दररोज औषधांवर पैसे खर्च करावे लागतात. वास्तूनुसार, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि काही गोष्टी लक्षात ठेवून या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या (Vastu Tips) कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया.
सकारात्मकता आणि चांगल्या आरोग्यासाठी वास्तु टिप्स
- वास्तूनुसार जुन्या आणि निरुपयोगी वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये.
- पलंगाच्या समोर आरसा नसावा, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
- बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो लावणं शुभ मानलं जात नाही.
- बेडरूमच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी. अस्वच्छ बेडरूममुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
- याशिवाय जेवताना नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं.
- घरातील बिघडलेला नळ त्वरित दुरुस्त करा. नळातून टपकणारे पाण्याचे थेंब अशुभ मानले जातात.
- उत्तम आरोग्यासाठी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणं वास्तूमध्ये फायदेशीर मानलं जातं. यामुळे तणाव कमी होतो, असं मानलं जातं.
- वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबऱ्याजवळ जास्त कचरा जमा होऊ देऊ नये, याचा आरोग्यावर परिणाम होतो.
- मुलांनी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करावा, यामुळे मुलांचा अभ्यासात अधिक रस निर्माण होतो.
- उत्तम आरोग्यासाठी घरात झाडं लावा, यामुळे सकारात्मकता वाढते आणि कुटुंबातील सदस्य आनंदी राहतात.
- घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा.
- जर तुमचा बीपी उच्च राहत असेल तर तुम्ही घरामध्ये स्पायडर प्लांट लावू शकता. यामुळे तुमच्या सभोवतालची हवाही स्वच्छ होईल.
- चांगल्या झोपेसाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एक लहान लॅव्हेंडर प्लांट देखील ठेवू शकता. यामुळे तणाव कमी होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :