Travel : आपल्या घराची नेहमी काळजी घेणारी आई, पण तिचे काम फक्त घर सांभाळणे आहे का? तुम्ही नेहमी तुमच्या आईला अशा सर्व गोष्टी करताना पाहिलं असेल जे तुम्हाला कदाचित शक्य नसेल. आई कधीच कामातून सुट्टी घेत नाही, ती आजारी असली तरी कुटुंबासाठी जेवण बनवते आणि सर्व कामे करते. पण आता तिला राणीसारखं वागवण्याची वेळ आली आहे. जरी रोज तुम्हाला तिला तशी वागणूक देणे जमत नसले तरी तुम्ही तिच्यासाठी मदर्स डे खास बनवू शकता.


आईचे काम फक्त घर सांभाळणे आहे का? मदर्स डे ला तिला राणीसारखं वागवा


प्रत्येक आईची इच्छा असते की, तिच्या आयुष्यात असा दिवस यावा, जेव्हा कोणीतरी तिला स्वयंपाक करून खाऊ घालेल. एक दिवस तिला घरचे कोणतेही काम करावे लागणार नाही आणि दिवसभर मस्त फिरता येईल. मदर्स डेच्या दिवशी तुम्हाला तुमची आई राणीसारखं वाटून द्यायचं असेल तर तिला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्लॅन करा. जर एखाद्या दिवशी आईला घरातील कामातून ब्रेक मिळाला तर तिला खूप आनंद होईल. या मदर्स डे च्या दिवशी तुम्ही आईला पुण्यातील या प्रसिद्ध ठिकाणी घेऊन जाऊ शकता. इथे गेल्यावर तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असेल.


 




मुळशी तलाव आणि धरण


मुळशी तलाव किंवा धरण हे ठिकाण जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाणारे धरण आहे. पण ते पुण्यातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. कारण येथे दररोज पर्यटकांची गर्दी असते. कारण शहरातील गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या प्रसन्न वातावरणात आराम करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे ठिकाण दोन टेकड्या आणि हिरव्यागार जंगलांच्या मध्ये वसलेले आहे. त्यामुळे ते आणखी पर्यटकांना आकर्षित करते. तुम्हाला तुमच्या आईला शांत आणि हिरवेगार वातावरण असलेल्या ठिकाणी घेऊन जायचे असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता. हे ठिकाण पुण्यातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.


वेळ- सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत तुम्ही येथे जाऊ शकता.


 






इमॅजिका


Adlabs Imagica हे 130-एकरचे थीम पार्क आहे, जे तुम्हाला शहराच्या गजबजाटापासून दूर आरामदायी अनुभव देईल. हे पार्क लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांसाठी खास आहे. हे तीन उद्यानांमध्ये विभागले गेले आहे. ज्यात थीम पार्क, वॉटर पार्क आणि स्नो पार्क यांचा समावेश आहे. इथेही अनेक फूड कॉर्नर आहेत. जर तुम्हाला तुमच्या आईला उन्हापासून आराम आणि मौजमजा करण्यासाठी कुठेतरी घेऊन जायचे असेल तर इथे जाण्याचा प्लॅन करा. हे पुण्यातील कुटुंबासह भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.




पाषाण तलाव


पुण्यातील पाषाण तलावात तुम्ही एका अनोख्या संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता. हे एक मानवनिर्मित तलाव आहे, जे आपल्या सौंदर्य आणि ताजेपणासाठी ओळखले जाते. हे पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. नैसर्गिक दृश्ये आणि पाण्याला स्पर्श करणारी थंड वाऱ्याची झुळूक हे ठिकाण आणखीनच आकर्षक बनवते. येथे तुम्ही तुमच्या आईसोबत एक दिवसाच्या पिकनिकला येऊ शकता. तुम्ही येथे बोटिंग आणि फिशिंग सारख्या गोष्टी देखील करू शकता.



आईला धार्मिक स्थळांना भेट द्यायला आवडत असेल तर...


तुमच्या आईला धार्मिक स्थळांना भेट द्यायला आवडत असेल तर तुम्ही तिला ओंकारेश्वर मंदिर, गणेश मंदिर, पार्वती टेकडी मंदिर आणि खंडोबा मंदिर यासारख्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता.


 


हेही वाचा>>>


 


Travel : भारतातील 'या' मंदिराचा आदर्श घ्या..! मासिक पाळीतही महिलांना पूजा करण्याची परवानगी, 'त्या' काळात महिलांना अपवित्र मानत नाही


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )