Monsoon Travel : गारवा..वाऱ्यावर भिरभिर पारवा..., भिजून गेला वारा... वारा गाई गाणे... पावसावर अशी अनेक गाणी आहेत. जी आपल्याला मंत्रमुग्ध करतात. ही गाणी ऐकायला जितकी मधुर वाटतात. तितकीच ती पाहायला देखील छान वाटतात. याचं कारण म्हणजे या गाण्यात दाखवण्यात आलेले डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य..! ही दृश्य पाहिल्यास आपल्यालाही त्या ठिकाणी भेट द्यावीशी वाटते, हो ना...? मग आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी असलेले असे ती ठिकाण सांगणार आहोत. जिथे तुम्ही अशा प्रकारचे दृश्य अनुभवू शकता. तसेच रिल्स करू शकता, छान फोटोही काढू शकता...


 


लोणावळ्यात जाण्याचा विचार करत असाल तर...


सुट्टी आणि पाऊस हे समीकरण एकदा जुळून आलं की, अनेकदा लोकांना एखाद्या शॉर्ट ट्रिपला जायला आवडते. याचं कारण म्हणजे कमी पैसे खर्च होतात आणि ऑफिसमधून बरेच दिवस सुट्टीही घ्यावी लागत नाही. पण कोणत्याही ठिकाणी लहान सहलीचे नियोजन करायचे असेल तर चांगली ठिकाणे निवडणे अवघड होऊन बसते. कारण छोट्या सहलीत त्या ठिकाणची प्रसिद्ध ठिकाणं कव्हर करायची असतात. जर तुम्ही लोणावळ्यात जाण्याचा विचार करत असाल आणि कोणत्याही 3 चांगल्या ठिकाणांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांना तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान भेट दिलीच पाहिजे, अन्यथा तुमची सहल अपूर्ण राहील...





राजमाची पॉइंट - हिरव्यागार डोंगर-दऱ्यांचे सुंदर दृश्य अनुभवा!


राजमाची पॉईंटवरून तुम्हाला लोणावळा आणि आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगर-दऱ्यांचे सुंदर दृश्य दिसते. तुम्ही लोणावळ्याला जात असाल तर हे ठिकाण अजिबात चुकवू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. पावसाळ्यात ते स्वर्गासारखे दिसते. येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता तसेच ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. ट्रेकिंग आणि हायकिंगची आवड असलेले लोक जवळपासच्या शहरांमधून येथे येतात. शिवाजी किल्ला पण राजमाची पॉईंट जवळ आहे, तो पण बघायला विसरू नका. किल्ल्याच्या तटबंदीवरून आजूबाजूच्या परिसराचे भव्य दृश्य लोकांना येथे येण्यास भाग पाडते.


 





भुशी धरणला जा.. पण काळजी घेऊनच..


लोणावळ्यात जाऊन भुशी डॅम दिसला नाही तर खरच पश्चात्ताप होईल. लहान सहलीचे नियोजन करणाऱ्यांनीही येथे येण्याचे नियोजन करावे. धरणाच्या आजूबाजूला एक सुंदर धबधबाही आहे, जो पावसाळ्यात आणखीनच आकर्षक बनतो. ते पाहण्यासाठी लांबून पर्यटक येतात. भुशी धरण लोणावळा शहराला लागून असल्याने येथे पोहोचणे खूप सोपे आहे. भुशी डॅमच्या आजूबाजूला अनेक हायकिंग ट्रेल्स आहेत, जे ट्रेकिंग प्रेमींसाठी एक चांगला अनुभव असेल. मात्र, पावसाळ्यात ट्रेकिंग टाळावे हे लक्षात ठेवा.





लोहगड किल्ला - लोणावळा आणि त्याच्या आसपासच्या परिसराचे सुंदर दृश्य पाहा..



आता तुम्ही लोणावळ्याला गेलात तर हा किल्ला जरूर बघावा. या सर्व ठिकाणांना तुम्ही छोट्या ट्रिपमध्ये अवश्य भेट द्या. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमची सहल पूर्ण झालेली दिसेल. कारण ही तिन्ही ठिकाणे लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहेत. येथे तुम्हाला पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळेल. लोहगड किल्ला एका उंच टेकडीवर वसलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला लोणावळा आणि त्याच्या आसपासच्या परिसराचे सुंदर दृश्य दिसते.


 


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : मुंबई-पुण्यापासून जवळ.. छोट्या पायवाटेने 'या' सुंदर धबधब्याकडे पोहचा, पण काळजी घेऊनच! मोजक्या लोकांनाच माहित...


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )