Monsoon Travel : सध्या कामाच्या तणाव इतर जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना मनमोकळं फिरता येत नाही. पण पावसाळा आला की निसर्गप्रेमींना वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे... जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याजवळ राहत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा धबधब्याबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर कमी गर्दीत तुम्हाला निसर्गसुख अनुभवता येईल. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचे अफाट सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. या डोंगररांगांमध्ये अनेक ट्रेकिंगची ठिकाणं, ऐतिहासिक किल्ले आणि अनेक नैसर्गिक धबधबे आहेत, जे पर्यटकांना भुरळ घालतात. साहसी पर्यटनापासून ते धार्मिक पर्यटनापर्यंत सर्व प्रकारची पर्यटनस्थळं येथे उपलब्ध आहेत. आज आम्ही मी तुम्हाला सह्याद्रीच्या याच डोंगररांगांतून वाहणाऱ्या एका सुंदर धबधब्याविषयी सांगणार आहे, इथे कसे पोहचाल, काय काळजी घ्याल? जाणून घ्या..


 


यामुळे इथे लोकांची फारशी वर्दळ नाही...


आम्ही ज्या धबधब्याबद्दल सांगत आहोत, त्याचे नाव कुंभे धबधबा आहे, जो महाराष्ट्रातील माणगाव येथे आहे. कुंभे धबधबा हा सह्याद्रीच्या डोंगररांगांतून वाहतो. माणगावहून छोट्या पायवाटेने तुम्ही या धबधब्याकडे जाल, तेव्हा याची उत्सुकता दुरूनच तुमच्या मनात गुंजायला लागेल. मोठ्या शहरांच्या कोलाहल आणि गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत वाहणाऱ्या या धबधब्याबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती आहे. यामुळे इथे लोकांची फारशी वर्दळ नाही. यामुळेच तुम्ही येथे अतिशय शांत वातावरणात निसर्गसुखाची अनुभूती घेऊ शकता. 


तुमच्या गोपनीयतेत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही


जर तुम्हाला काही काळ कामातून विश्रांती घेऊन एखाद्या नैसर्गिक पर्यटनस्थळाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी कुंभे धबधबा हा उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण इथे तुमच्या गोपनीयतेत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही तुमची सुट्टी इथे खूप आरामात घालवू शकता. तसेच, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगद्वारे तुम्ही तुमची सुट्टी आणखी आनंदी करू शकता. कुंभे धबधब्याचे अफाट सौंदर्य पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. लोक सहसा येथे पिकनिक, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी येतात. जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर तुम्हाला हे ठिकाण खूप आवडणार आहे. निसर्ग फोटोग्राफी करणाऱ्या लोकांसाठी कुंभे धबधबा हे फोटोग्राफीचे एक उत्तम ठिकाण आहे. जिथून तो शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकतो.





कुंभे धबधब्याला भेट देण्याची उत्तम वेळ


कुंभे धबधब्याला कधीही भेट देता येते, परंतु पावसाळ्यात येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कारण यावेळी धबधब्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यावेळी आजूबाजूला हिरवळ पाहायला मिळते. त्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. पावसाळ्यात धबधब्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे धबधबा आणखी वेगाने पुढे सरकतो. जेव्हा तुम्ही डोंगराच्या मधोमध वाहणारा धबधबा पाहता, तेव्हा त्याचे सौंदर्य पाहून तुम्हालाही काही क्षण वाटेल की यापेक्षा सुंदर काय असू शकते? आणि सुख म्हणजे हेच असते, असं वाटेल


 


कुंभे धबधब्याला कसे पोहचाल?


माणगावला जाण्यासाठी रस्त्याने जायचे असेल तर माणगाव बसस्थानकापर्यंत बसची सोय आहे. 
जर तुम्हाला ट्रेनने माणगाव गाठायचे असेल तर माणगाव येथे रेल्वे स्टेशन देखील आहे. 
हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी, कुंभे धबधब्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे. 
जे कुंभे धबधब्यापासून 126 किलोमीटर अंतरावर आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )