Mahavikas Aghadi Jode Maro Andolan : सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आक्रमक झाली आहे. आज मविआच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची सुरुवात हुतात्मा चौकातून सुरु झालं आहे. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी परवागी लागते का? आणि तशी परवानगी लागत असेल तर हे औरंगजेब फॅन क्लबचे राज्य असल्याचे राऊत म्हणाले. 


हजारो लोक काय परवानगी घेऊन जमलेत का?


हुतात्मा चौकात हजारो लोक जमले आहेत. हे लोक काय परवानगी घेऊन जमलेत? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी परवागी लागते का? असा सवालही राऊतांनी केला. दरम्यान, भाजप देखील आज महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, आजप काय आम्हाला उत्तर देणार. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर राहावा म्हणून आंदोलन करत आहोत,. भाजप आमच्या विरोधात आंदोलन करत असल्याचे राऊत म्हणाले.  


हुतात्मा चौक हे गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा


दरम्यान, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा हुतात्मा चौक हे गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी अद्यापही परवानगी दिली नाही. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.


महाविकास आघाडीच्या आंदोलनात बड्या नेत्यांची उपस्थिती


दरम्यान, आजच्या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख (शरद पवार गट) शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. 


मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था


मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यानंतरही विरोधक मोर्चे काढत आहेत. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Mahavikas Aghadi in Mumbai Jode Maro movement : मुंबई पोलिसांची परवानगी झुगारत महाविकास आघाडीचा एल्गार; शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंसह दिग्गज हुतात्मा चौकात पोहोचले