5 Top Stocks to Buy: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून चालू झाले आहे. 23 जुलै रोजी केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2023-24 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाचा भांडवली बाजारावर परिणाम पडणार आहे. याच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअरखान या ब्रोकरेज फर्मने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच्या शेअर्सची यादी सांगितली आहे. 


ब्रोकरेज हाउस शेअरखानने (Sharekhan) दमदार फंडामेंटल असणाऱ्या 5 शेअर्सना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये Infosys, L&T Finance, Maruti, Dabur India, NTPC या शेअर्सचा समावेशआहे. हे शेअर्स आगामी एका वर्षात 26 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 


Infosys


शेअरखानने Infosys चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही या कंपनीचे शेअर घेत असाल तर त्यासाठी 2050 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असे शेअरखानने सूचवले आहे. 19 जुलै 2024 रोजी हा शेअर 1789 रुपयांवर होता. सद्यस्थितीला हा शेअर 15 टक्क्यांनी वाढताना दिसतोय. 


L&T Finance


शेअरखानने L&T Finance या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 महीन्यांपेक्षा अधिक काळाच्या गुंतवणुकीसाठी या शेअरचे टार्गेट 220 ठेवावे, अस शेअरखानने म्हटले आहे. 19 जुलै 2024 रोजी हा शेअ 175 रुपये होता.  
शेअरखानने Maruti हा शेअरदेखील खरेदी करावा, असे सांगितले आहे. 12 महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी या शेअरचे टार्गेट 14434 रुपये ठेवायला हवे, असे शेअरखानने म्हटले आहे. 19 जुलै 2024  रोजी हा शेअर 12535 रुपयांवर होता.


Dabur India


Dabur India या कंपनीतही गुंतवणूक करावी, असे शेअरखानने म्हटले आहे. 12 महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी या शेअरला 715 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असा सल्ला शेअरखानने दिलाय. 19 जुलै 2024 रोजी हा शेअर 631 रुपयांवर होता. 


NTPC


शेअरखानने NTPC कंपनीचे शेअर खरेदी करावेत, असे म्हटले आहे. 12 महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी प्रति शेअर टार्गेट 425 रुपये ठेवावे, असे शेअरखानने म्हटलेय.19 जुलै 2024 रोजी हा शेअर 364 रुपयांवर होता.
 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार? किसान क्रेडिट कार्डविषयीही मोठा निर्णय? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता!


केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते 'ही' मोठी खुशखबर, अर्थसंकल्पात घोषणा होणार का?


या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस, येणार तब्बल 8 आयपीओ!