Monsoon Fashion : पावसाळा आला की, सोबत एक आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. एप्रिल-मे महिन्यातील त्या कडक उन्हापासून आता लोकांना दिलासा मिळाला आहे, जे लोक नोकरीनिमित्त बाहेर पडतात. अशा लोकांना पावसात नेमके कोणते आऊटफिट्स घालावे याची चिंता असते. पावसात कपडे भिजतात, मेकअप खराब होतो, आपला लूक खराब होते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू लागते. तर आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात नेमके कोणते आऊटफिट्स घालावे? या बद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा लूक साधा राहील, आणि सुंदरही दिसेल, जाणून घ्या...
पावसाळ्यात सूट घालणे हा उत्तम पर्याय..!
पावसाळ्यात सूट घालणे हा उत्तम पर्याय असू शकतो. स्त्रिया सूटमध्ये कम्फर्टेबल राहतात, त्या या आउटफिटमध्ये स्टायलिश दिसतात. जर तुम्हाला साधा लुक हवा असेल तर तुम्ही या लेखात दाखवलेल्या सूट डिझाईनमधून कल्पना घेऊ शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे काही लूक दाखवणार आहोत, ज्यावरून तुम्ही अशा प्रकारचे साधे सूट घालण्याची कल्पना घेऊ शकता.
हेवी नेकलाइन सूट
अभिनेत्री अदिती राव हैदरीप्रमाणे, तुम्ही साध्या लूकसाठी हेवी नेकलाइन सूट घालू शकता. हा सूट साधा आहे पण या सूटमध्ये गळ्याजवळ हेवी काम केलेले आहे. तुम्ही या प्रकारचा सूट बाजारातून खरेदी करू शकता आणि ते तुम्ही ऑनलाइनही स्वस्त दरात खरेदी करू शकता आणि हा सूट तुम्हाला 1000 ते 3000 रुपयांना मिळेल. या प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही फूटवेअर म्हणून हिल्स घालू शकता आणि या सूटसह तुम्ही मिरर वर्क ज्वेलरी देखील स्टाईल करू शकता.
अनारकली सूट
साध्या लूकसाठी तुम्ही या प्रकारचा सूट देखील घालू शकता. अभिनेत्री नितांशी गोयल हिने हा अनारकली सूट परिधान केला आहे. तुम्ही हा सूट देखील अनेक प्रसंगी परिधान करू शकता. या सूटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिल्स आणि दागिन्यांमध्ये इअररिंग्स घालू शकता. तसेच तुम्ही बाजारातून या प्रकारचा सूट खरेदी करू शकता. तुम्ही हा सूट 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.
चंदेरी सूट
पावसाळ्यात सिंपल लूक हवा असेल तर हा चंदेरी सूट पावसाळ्यातही घातला जाऊ शकतो. हा सूट कसा घालायचा यासाठी तुम्ही अभिनेत्री सोनम कपूरकडून कल्पना घेऊ शकता. या सूट सोबत लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिल्स घालू शकता. सोबत मिरर वर्क ज्वेलरी घालू शकता. तुम्ही हा सूट बाजारातून विकत घेऊ शकता आणि 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही तो ऑनलाइनही खरेदी करू शकता.
हेही वाचा>>>
Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )