Fashion : मेकअप म्हटला की सर्वच वयोगटातील स्त्रियांचा आवडीचा विषय, कार्यक्रम कोणताही असो, मेकअप तर झालाच पाहिजे, मग तो लाईट मेकअप असो... किंवा डार्क मेकअप का असेना.. विविध प्रसंगी बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार मेकअप केला जातो. आजकाल विविध ऋतूनुसारही मेकअप केला जातो. त्यानुसार मेकअपसाठी, त्वचेच्या टोननुसार उत्पादनं आणि शेड्स निवडली जातात. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक महिलांना मेकअपचे खूप टेन्शन येते. पण चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअपच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे पावसात तुमचा मेकअप अजिबात खराब होणार नाही. जाणून घ्या..
मेकअप करताना त्वचेचा प्रकार समजून घ्या..
आपण कुठेही गेलो तरी आपल्या सर्वांना मेकअप करायला आवडतो. आजकाल, बदलत्या ब्युटी ट्रेंडमुळे, तुम्हाला याचे ऑनलाइनही अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. मेकअप करताना त्वचेचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे असले तरी हवामानाची विशेष काळजी घेणेही गरजेचे आहे. आजकाल तुम्हाला अनेक मेकअप ट्रेंड्स ऑनलाइनही पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत वॉटरप्रूफ मेकअपला खूप पसंती दिली जात आहे. तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप वॉटरप्रूफ आणि दीर्घकाळ टिकणारा कसा करू शकता ते जाणून घ्या..
मेकअपसाठी कोणते प्रॉडक्ट निवडायचे?
मेकअप करण्यासाठी, कोणत्याही चांगल्या ब्रँडची उत्पादने निवडा. यासाठी तुम्ही ऑइल बेसऐवजी सिलिकॉन बेस मेकअप निवडू शकता. तुमचा मेकअप वॉटरप्रूफ करण्यासाठी, हेवी उत्पादनांऐवजी हलक्या वजनाच्या बेस मेकअप उत्पादनांची निवड करण्याचा प्रयत्न करा.
मेकअप सेट करण्यासाठी काय करावे?
मेकअप सेट करण्यासाठी तुम्ही पावडरची मदत नक्कीच घ्याल, मेकअप मध्येच खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी मेकअप केल्यानंतर सेटिंग स्प्रेने सेट करायला विसरू नका.
फाउंडेशन आणि कन्सीलर कसे सेट करावे?
लिक्विड आणि क्रीम प्रॉडक्ट सेट करण्यासाठी, तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरऐवजी लूज पावडरची मदत घेऊ शकता. कारण कॉम्पॅक्ट पावडरचा पोत जड असतो आणि लूज पावडर खूप हलकी असते. लूज पावडर लावल्यानंतर, मेकअप सेट झाल्यानंतर ती काढण्यास विसरू नका.
हेही वाचा>>>
Lipstick Hacks : अरे देवा.. ओठांवर लावलेली लिपस्टिक लगेच गेली.. चिंता करू नका, 'या' टिप्सची मदत घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )