Mirzapur Season 3 OTT Release : 'मिर्झापूर 3' ची (Mirzapur Season 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन मध्यरात्रीपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होऊ लागला आहे. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा यांची भूमिका आहे. 'मिर्झापूर'चा सीझन 3 हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज आहे. तुम्हाला प्राईम व्हिडिओवर ही वेब सीरिज मोफत पाहता येईल. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
प्राईम व्हिडीओवर मिर्झापूरचा तिसरा सीझन मोफत कसा पाहाल?
Amazon Prime Video वर बहुचर्चित वेब सीरिज रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. प्राईम व्हिडीओने आपल्या नव्या युजर्ससाठी एक महिना मोफत स्ट्रीमिंग दिले जाते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड तुमच्या Amazon खात्यात अॅड करावे लागेल. मात्र, यामध्ये तुम्ही Amazon.com कॉर्पोरेट क्रेडिट लाइन, चेकिंग अकाउंट, प्रीपेड क्रेडिट कार्ड आदी अॅमेझॉनच्या या फ्री-ट्रायलमध्ये वापरता येणार नाही.
सब्सक्रिप्शन असणाऱ्यांना कसे पाहता येईल?
तुम्हाला प्रॉपर ॲप वापरून 'मिर्झापूर 3' पाहण्यात स्वारस्य असल्यास, तुम्हाला प्राईम व्हिडीओ अॅप इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सब्सक्रिप्शन प्लान निवडून पेमेंट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही अॅपमध्ये जाऊन मिर्झापूर-3 ही सीरिज पाहता येईल.
5 जुलै रोजी मध्यरात्रीपासूनच 'मिर्झापूर 3' स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली आहे. 'मिर्झापूर'च्या या तिसऱ्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी मध्यरात्रीपासूनच मिर्झापूरचे एपिसोड पाहण्यास सुरुवात केली आहे.
गुड्डूचे अनेक शत्रू...कोणाकोणाला भिडणार?
मागील सीझनमध्ये गुड्डू पंडितने आपला सूड उगवताना अनेकांना शत्रू बनवले आहेत. मुन्ना भैय्याला संपवलं, कालीन भैय्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. आता कालीन भैय्याची फौज त्याच्या मागे लागली आहे. माधुरी यादव, छोटे शुक्लासोबत इतर काहीजण कालीन भैय्यासाठी झगडणार आहेत. या सगळ्यांच्या रडारवर गुड्डू पंडित आहे. त्याला संपवण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत.