Nita Ambani: नीता अंबानींच्या सर्वात महागड्या नेकलेसच्या कलेक्शनमध्ये असणाऱ्या एका नेकलेसची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. या नेकलेसमध्ये विलक्षण सुंदर पाचू आहेत. दुर्मिळ रंगीत रत्नजडीत हाराची अधिकृत किंमत माहित नसली तरी एखाद्या छोट्या राष्ट्राच्या जीडीपीएवढी आहे! निता अंबानी असो की ईशा अंबानी या दोघींकडे असणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची कायम चर्चा होत असते. या दोघीही फॅशनच्या बाबतीत चोखंदळ आहेत. मुघलकालिन काळातला बाजूबंद असो की मोठ्या पायघोळ पदरांची फॅशन असो. निता अंबानी फॅशनसह दागिन्यांची निवडही अतिशय बारकाईनं करतात. पण अंबानींच्या घरातील दागिन्यांचे हे उत्कृष्ट नमुने तयार कोण करतं?
कुठे तयार होतात अंबानी कुटुंबातील दागिने?
मुंबईत स्थापन झालेल्या पारंपरिक हेरिटेज ज्वेलरी हाऊसमधून अंबानींचे दागिने बनवले जातात. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नात निता अंबानींनी घातलेल्या पाचूच्या या सर्वात महागड्या हाराला याच हेरिटेज हाऊसमधल्या तज्ञांनी बनवलंय. या हेरिटेज हाऊसची अंबानी कुटुंबियांसाठी दागिने बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. अंनंत अंबानी नीता अंबानी यांची प्रतिष्ठित सरपंच डिझाईन याच हेरिटेज हाऊसमधल्या हातांनी जिवंत केला होता. त्यावेळी कांतीलाल छोटेलाल यांनी नीता अंबानींचे दागिने बनवले होते.
निता अंबानींचा सर्वात महागडा हार!
नीता अंबानी यांच्या दागिन्यांच्या संग्रहात असलेल्या प्रत्येक तुकड्याला एक वेगळीच कथा आहे, पण त्यांच्या पन्ना हाराची गोष्ट खासच आहे. हिर्यांसह अनेक मौल्यवान रत्ने असले तरी पन्न्याची ती झळाळी कुणाचेही लक्ष वेधून घेते.फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, या पन्ना हाराची किंमत 400 ते 500 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. Luxurylaunches ने दिलेल्या माहितीनुसार, या दागिन्याच्या निर्मितीसाठी तब्बल पाच कारागीरांनी सलग तीन वर्षे मेहनत घेतली.हा अप्रतिम पन्ना हार नीता अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या समारंभात परिधान केला होता. त्या प्रसंगी या दागिन्याने संपूर्ण कार्यक्रमाला चारचाँद लावले. या दागिन्याचा केंद्रबिंदू होता. मोठ्या पन्ना दगडाने सुशोभित लांब हार, जो एक विलक्षण कलाकृती म्हणून ओळखला जातो.अशा दागिन्यांच्या माध्यमातून केवळ वैभवच नाही, तर अद्वितीय कौशल्य आणि कलेची छापही दिसते. नीता अंबानींच्या पन्ना हाराने हीच गोष्ट अधोरेखित केली आहे!