Makar Sankranti 2024, Avoid Wearing Black This Year : सध्या देशभरात मकर संक्रांतीचं (Makar Sankranti) वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 ला आहे. शास्त्र आणि मान्यतांनुसार, सणाच्या दिवशी कपडे आणि त्यांच्या रंगाचं विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीला काळा रंग (Black Colour) शुभ मानला जातो. बहुतेक लोक मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात किंवा साडी नेसतात. यंदाच्या मकर संक्रांतीला मात्र काळ्या रंगांचे कपडे घालण्याची चूक करू नका. यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका. यामागचं कारण काय आणि यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालणं शुभ राहील, हे जाणून घ्या.


यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नका


संक्रांती देवी कुठल्या रंगाच वस्त्र परिधान करुन येते आणि देवीचं वाहन काय आहे, याला फार महत्त्व असतं. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाची साडी परिधान करुन येते, तो रंग मकर संक्रांतीला वर्ज्य असतो म्हणजे त्या रंगाचे कपडू वस्तू वापरत नाहीत. यंदा संक्रांती देवी ही काळा रंगाची साडी नेसून आणि  घोड्यावर बसून येणार आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला काळा रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका.


'हे' आहेत रंग शुभ


हिंदू रीतिरिवाज आणि विधींमध्ये रंगावर विशेष लक्ष दिले जाते. सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ असते असे शास्त्रात सांगितले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने शनिदेवासह सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.


लाल


हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानतात. लाल रंग परिधान करणार्‍यांना देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद मिळतो, अशी धारणा आहे. या मकर संक्रांतीला विवाहित महिलांना काळा रंगद परिधान करण्याऐवजी लाल रंगाची साडी नेसावे. हा रंग यंदाच्या मकर संक्रांतीसाठी शुभ आहे.


हिरवा


हिंदू धर्म लाल रंगाप्रमाणे हिरवा रंगही सौभाग्याचं प्रतिक मानला जातो. आराध्य दैवत गणपतीला हिरवा रंग आवडतो आणि हिरवा रंग धारण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, असंही म्हटलं जातं. यंदाच्या मकर संक्रांतीला सौभाग्यवती महिलांनी हिरवा रंग परिधान करणं शुभ राहील.


पिवळा


भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा पिवळ्या रंगाशी संबंध आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे, लाभदायक मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा अध्यात्म आणि धर्माशी संबंधित ग्रह आहे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग परिधान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)