Makar Sankranti 2024 : नवीन वर्ष 2024 (New Year 2024) हे सुरु झालं आहे. नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा, आकांशा, उत्साह आणि आनंद घेऊन येतो. या वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांतीचा सण. मकरसंक्रांत येत्या 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दरम्यान आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. तसेच, 'तिळगुळ घ्या गोड बोला' असं म्हणतं आपण संक्रांतीच्या दिवशी (Makar Sankranti) तिळाच्या (Sesame Seeds) वड्या, लाडू वाटतो. संक्रांतीला तिळाच्या लाडूंचं फार महत्त्व आहे. तसेच, तीळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. संक्रांतीला तीळ खाण्यचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
तिळाचे आरोग्यदायी फायदे (Benefits Of Sesame Seeds)
तिळामध्ये तांबे आणि मॅगनीज मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या सर्व गोष्टी देखील तिळामध्ये असतात. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात. कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो. तीळ खाल्ल्याने पचनक्रिया देखील चांगली होती. यांसारखे अनेक फायदे तीळ खाल्ल्याने होतात.
केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी करताना अनेकांना रेडिएशनचा त्रास होते. या रेडिएशनमुळे शरीरावर होणाऱ्या नुकसानापासून देखील तीळ संरक्षण करते. तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते. जुलाबाचा त्रास होत असेल तर एक चमचा भिजलेल्या तिळाची पूड, एक चमचा गायीचं तूप आणि सहा चमचे शेळीचं दूध एकत्र करून दिवसातून तीन वेळा घ्यावे. पोट दुखत असेल किंला फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो. मूळव्याधाचा त्रास असेल तर हिंग वाटून लोण्याबरोबर खाल्ल्याने आराम मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.