Travel : आपल्या भारतातच (India) इतकी सुंदर पर्यटन स्थळे (Travel Place) आहेत की, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज वाटणार नाही, कारण ही ठिकाणं तुमचं मन मोहल्याशिवाय राहणार नाही. भारतातील सुंदर नैसर्गिक दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील, त्यामुळे आता एप्रिल-मे महिन्यात जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीचे नियोजन करत असाल, तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. तुम्हाला माहित आहे का? भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे भेट देणे अत्यंत धोकादायक आहे. जर तुम्ही कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करत असाल तर या ठिकाणी जाणे टाळावे. कारण या ठिकाणांना भेट देणे मुलांसाठी सुरक्षित नाही. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे.


एकीकडे भारतातील सुंदर प्रेक्षणीय स्थळं पर्यटकांच्या मनाला भूरळ घालते, तर दुसरीकडे अशी काही ठिकाण आहेत. जिथे तुम्ही जायचा विचार न केलेलाच बरा आहे. जाणून घ्या सविस्तर..



कांगरी


तुम्ही कधी कांगरी या ठिकाणाबद्दल ऐकले आहे का? या ठिकाणाबद्दल सांगायचं म्हणजे हे ठिकाण गुजरातमध्ये वसलेले आहे. इथल्या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत अवघड आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जात असाल तर इथे जाणे टाळावे. या ठिकाणी असलेला स्टोक हे कांगरी, लडाखमधील ट्रेकिंग पॉइंट आहे. असे अनेकदा दिसून येते की लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह ट्रेकला जाण्याचा बेत करतात. पण मुलांसोबत ट्रेकिंगला जाण्यासाठी हे ठिकाण सुरक्षित नाही. कारण या पर्वताची उंची 6153 मीटर आहे आणि ते बर्फाने झाकलेले आहे, त्यामुळे येथे कुटुंबासह जाणे धोक्याशिवाय नाही.




 


बॅरेन बेट



जर तुम्ही कुटुंबासह अंदमान निकोबारला जाण्याचा विचार करत असाल तर बॅरेन बेटावर जाण्याचा विचार करू नका. कारण भारतात हे एकमेव ठिकाण आहे जिथे सक्रिय ज्वालामुखी आहे. राजधानी पोर्ट ब्लेअरपासून ते 135 किमी अंतरावर आहे. तुम्ही कुटुंबासह सहलीला जात असाल तर गर्दीच्या ठिकाणाऐवजी शांत जागा निवडावी. कुटुंबाने केवळ निवासी भागांना भेट दिली पाहिजे. कारण या ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आणि सुविधा सहज मिळू शकतात.


 




द्रास
 


एकीकडे लडाखमध्ये असलेल्या या वसाहतीत दहशतवादी हल्ल्याची चिंता आहे, तर दुसरीकडे इथली थंडी जीवघेणी ठरू शकते. हे ठिकाण कारगिल शहराच्या मध्यभागी आहे. याला भारतातील सर्वात थंड शहर देखील म्हटले जाते, कारण 1995 मध्ये येथील तापमान -60 अंश सेल्सिअस होते. आताही येथील तापमान इतर ठिकाणांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कुटुंबासह सहलीचा बेत करणे योग्य ठरणार नाही.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : मुंबईहून हनिमूनला निघताय? 'हनी' होईल खूश, ट्रीप कराल एन्जॉय! IRCTC चे पॅकेजस पाहिले?