Horoscope Today 29th March 2024 : आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस अनेक अर्थांनी चांगला तर अनेक अर्थांनी वाईटही असू शकतो. एकूणच आजचा दिवस मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने नेमका कसा असणार आहे या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मकर (Capricorn Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तरूणांनी ही संधी गमावू नका. 


व्यवसाय (Business) - जे व्यावसायित आहेत त्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा, इतरांच्या तुलनेत स्पर्धेत मागे राहाल. 


प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या नात्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी संवाद साधून वाद मिटवा.  


आरोग्य (Health) - तुम्हाला अनेक दिवसांपासून जो अस्वस्थपणा जाणवत होता तो हळूहळू कमी होईल. सकारात्मक विचार करण्यासाठी ध्यान करा. 


कुंभ (Aquarius Today Horoscope)


व्यवसाय (Business) - जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हं आहेत. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. 


कुटुंब (Family) - कुटुंबातील आई-वडिलांच्या तब्येतीमुळे सतत चिंतेत असाल. पण, चिंता करण्याची गरज नाही. वेळेवर उपचार आणि औषधांनी तब्येतीत सुधारणा होईल. 


शिक्षण (Education) - शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेतल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. अभ्यासातही मन रमेल. 


आरोग्य (Health) - आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. अस्वस्थ वाटल्यास मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा. 


मीन (Pisces Today Horoscope)


नोकरी (Job) - तरूणांना नवीन नोकरी मिळाल्याने खूप आनंद होईल. कामातही प्रगती होत राहील. फक्त एकाग्रतेने काम करा. 


कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदेल. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. आर्थिक समस्याही दूर होईल. 


प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर छान जाईल. नात्यातील जुन्या आठवणींना देऊन नातं खुलवण्याचा प्रयत्न करा. 


आरोग्य (Health) - तुमचं मानसिक आरोग्य फार चांगलं आहे. संकटांना कसं सामोरं जायचं हे तुम्हाला माहीत असल्या कारणाने चिंता करण्याची गरज नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Sagittarius April Horoscope 2024: धनु राशीच्या लोकांनी मुंगी होऊन साखर खावी, कसा असणार एप्रिल महिना? वाचा मासिक राशीभविष्य