Sleepiness after lunch : दिवसभरात जेव्हाही आपण अन्न (Food) खातो, त्यानंतर आपल्याला झोप (Sleep) येते. घरात राहणा-या लोकांसाठी ही समस्या तितकी गंभीर नसते, कारण दिवसभराच्या जेवणानंतर ते थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात. मात्र ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी समस्या आहे. दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती आणि झोप येते. ही झोप जास्त वेळ मागत नाही. केवळ 15 मिनिटांच्या झोपेनंतरही शरीर ताजेतवाने वाटेल, असे त्यावेळी वाटते. न्यूट्रीशनिस्ट एक्सपर्ट आणि डॉक्टरांनी याबाबत काय म्हणतात? जाणून घ्या (Lifestyle Marathi News)


शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज
आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा आपण अन्न खातो आणि अनेक प्रकारचे पोषक घेतो. डॉक्टर सांगतात की, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपले आतडे आणि संपूर्ण शरीर अन्न पचवण्यासाठी काम करू लागते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे आपल्याला सुस्त आणि झोप येते. तसेच, जेव्हा एखादी व्यक्ती जास्त साखरेचे अन्न खाते तेव्हा रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर वेगाने कमी होते. यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो आणि नंतर झोप येऊ लागते.  तसेच जेव्हा तुम्ही खाता, तेव्हा तुमच्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये म्हणजेच उर्जेमध्ये रूपांतर होते जसे ते तुमच्या पचनसंस्थेपर्यंत पोहोचते. अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लुकागन आणि अमायलिन यांसारखे संप्रेरक परिपूर्णतेची भावना निर्माण करतात. हे हार्मोन्स मेंदूमध्ये डुलकीचा सिग्नल देतात, ज्यामुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो आणि झोपल्यासारखे वाटते. जर वेळ मिळत असेल तर,आपण खाल्ल्यानंतर थोडी विश्रांती घेऊ शकता.जाणून घ्या जेवल्यानंतर झोप येण्याचे खरे कारण काय?


हार्मोन्समुळेही येते झोप 
झोप फक्त रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानेच येते हे आवश्यक नाही. कधीकधी शरीरातील हार्मोन्स देखील झोपेचे कारण असतात. अन्न खाल्ल्यानंतर, कधीकधी सेरोटोनिन वेगाने तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे व्यक्तीला झोपल्यासारखे वाटते. 


अन्नावर अवलंबून असते झोप 
काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीने ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो अॅसिड असलेले अन्न खाल्ले तर त्यामुळे झोप येऊ शकते. याचे कारण असे की, ते सेरोटोनिनची निर्मिती करण्यास कारणीभूत आहे. ट्रिप्टोफॅन अनेक प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की चीज, पनीर, पालक, टोफू, सोया, अंडी इत्यादी, या उच्च प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन अमिनो आम्ल आढळते. अन्नामध्ये ट्रिप्टोफॅन जितके जास्त असेल, तितके शरीरात झोपेचे नियमन करणाऱ्या सेरोटोनिनची पातळी जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने झोपेची खात्री असते


जेवल्यानंतर झोप आणि आळस दूर करण्यासाठी उपाय 
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी जेवल्यानंतर झोप न लागणे ही समस्या असते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना जेवल्यानंतर झोप येत नाही, यासाठी तुम्ही उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कायम राहते आणि सुस्ती जाणवत नाही. तसेच हलके अन्न खावे. दिवसा जास्त खाऊ नका. जर तुम्ही जास्त अन्न खाल्ले तर ते पचनसंस्थेवर जास्त भार टाकते, ज्यामुळे आळसासह झोप येते. 


8 ते 9 तासांची झोप आवश्यक 
प्रत्येक व्यक्तीसाठी 8 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. रात्रीची पूर्ण झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर काही कारणास्तव तुम्हाला रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर, दिवसा आळस येईल आणि तुम्हाला झोप येईल. अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर झोप लवकर येते आणि काम करणे कठीण होते. म्हणूनच दररोज पूर्ण झोप घेण्याची सवय लावा. मधुमेह, थायरॉईड, अशक्तपणा इत्यादी काही वैद्यकीय परिस्थिती देखील जास्त थकवा आणि झोपेची भावना होण्याचे कारण असू शकतात. अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्यानेही खूप झोप येते आणि काही वेळा काही औषधांमुळे झोपेचा आणि आळसाचा प्रभाव शरीरावर येतो. अन्न खाल्ल्यानंतर झोप लवकर येऊ लागते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : आठ तास झोपल्यानंतरही दिवसा सतत झोपावंसं वाटतं? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'या' आजाराचा धोका