Pune Political News : "छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या व्यक्तींना, जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप (Guwahati) भेट म्हणून दिली जाईल" अशा मजकुराचे फ्लेक्स सध्या पुण्यात (Pune) पाहायला मिळत आहे. याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे, नेमकं प्रकरण काय आहे?


राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या फ्लेक्सची चर्चा


औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायाला मिळत आहे. तर शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना दिसत आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहरातील अनेक भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून काही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून पक्षाकडून अजूनही संताप व्यक्त होत आहे 


 




 


राष्ट्रवादी काँग्रेस फ्लेक्स चर्चेत, काय लिहलंय फ्लेक्सवर?


राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या फ्लेक्सवर असा मजकूर लिहला आहे. ज्याला पाहून लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या फ्लेक्सवर लिहलंय, जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस  मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन मिळेल. त्याचबरोबर खाली टीपही देण्यात आली आहे. टीप - सदरची घोषणा कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देण्याकरता नसून केवळ छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आहे.


"स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या"


 छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं होतं. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा तो व्हिडीओ शेअर केला होता. तसेच दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असंही त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 


इतर बातम्या


Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, आणि राहुल गांधींचे 'फ्लाइंग किस'! व्हिडीओ व्हायरल