Oily Food : स्वयंपाकासाठी तेल ही रोजच्या जेवणातील अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्याचा वापर जवळपास प्रत्येक पदार्थात केला जातो. पण, रोजच्या आहारात जसे तेल आवश्यक असते, तसेच ते किती प्रमाणात असावे याची देखील काळजी घ्यावी लागते. आहारातील अतिरिक्त तेल अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरते. आहारात तेल नेहमी योग्य प्रमाणातच टाकावे. जेवणातील जास्तीचे तेल आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का?


आहारातील तेल हानिकारक आहेच. पण, जे लोक फास्ट फूड, तेलकट स्नॅक्सचे जास्त सेवन करतात, त्यांना देखील आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. या पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर शरीरावर कसा परिणाम करतो, ते जाणून घेऊया...


पचन समस्या


आपल्या शरीरात किती चरबी अर्थात फॅट जात आहे, हे अन्नातील तेलाचे प्रमाण ठरवते. फॅट जितके जास्त असेल, तितका पचनसंस्थेवर दबाव वाढतो. तेलाचे जास्त सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात.


वजन वाढते


तेलकट अन्नात कॅलरीज जास्त असतात. यामुळे वजनही वाढू शकते. जितके जास्त तेलकट पदार्थ तुम्ही खाता, तितके कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे चरबी वाढते आणि बेली फॅटची समस्या उद्भवू शकते.


हृदयरोगाचा धोका


तेलकट अन्नाचाही हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तेलकट अन्न नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.


पुरळाची समस्या


अन्नामधील जास्त तेलामुळे त्वचेला देखील नुकसान होऊ शकते. तेलकट पदार्थांचा आहारात समावेश करताच मुरुमांची समस्या वाढू लागते. जर, तुमची त्वचा आधीच तेलकट असेल, तर तेलकट पदार्थ खाणे तुमच्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकते.


मधुमेह


तेलकट आहार टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. जास्त तेलाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जर तेलकट नियमित अन्न खाल्ले, तर टाईप 2 मधुमेहाचा धोका जवळपास 15 टक्क्यांनी वाढतो. अशा समस्या टाळण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घ्या, तेलकट पदार्थ आणि तेलाच्या सेवनावर नियंत्रण ठेवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :