Soaked Dry Fruits Benefits : बदलत्या जीवनशैलीचा विचार करता आपल्या शरीराकरता ड्रायफ्रुट्स खाणे अत्यंत गरजेचे आहे. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या  प्रमाणात पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याकरता उपयोगी पडतात. पण तुम्हाला माहित आहे का? जर हेच ड्रायफ्रुट आपण पाण्यात भिजवून मग खाल्ले तर त्यातील पौष्टीक घटक अजून वाढतात. या ड्रायफ्रुट्सचे जास्तीत जास्त फायदे भिजवून खाल्ल्यास मिळू शकतात. जाणून घेऊयात.


बदाम 


बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने त्यातील फायदेशीर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण जास्त वाढते. भिजवलेल्या बदामात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. सोबतच यात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते म्हणून भूक देखील कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. बदामात असणारे अँटी-आॅक्सीडेंट आणि Vitamin E त्वचेकरता फायदेशीर ठरते. यामुळे बदाम भिजवून मगच खावेत.


अक्रोड


अक्रोड भिजवून ठेवल्याने ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या फायदेशीर घटकांची शरीरात मात्रा वाढते. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्यातील पाणी काढून टाका आणि मग खावा. तुम्ही तीन ते चार तास देखील अक्रोड पाण्यात भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता. अक्रोड तुमची मेंदूची शक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो.


अंजीर 


अंजीर भिजवून खाल्ल्याने त्यात असणारे फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या फायदेशीर पोषक तत्वांची मात्रा शरीरात वाढते. रात्री झोपताना अंजीर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका. अंजीरमध्ये असणारे फायबर तुमचे चयापचन सुरळीत करण्यास मदत करेल. तर यात असणारे पोटॅशियम तुमच्या हाडांना मजबूत बनवेल. टाईप-2 डायबिटीज असलेले लोक भिजवलेले अंजीर खाऊन रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. 


मनुका


मनुका भिजवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. भिजवल्याने ते आणखी गोड होते आणि त्यातील जीवनसत्त्वाचे  प्रमाण वाढते. तर मनुक्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे वाढलेले वजन कमी करण्यात प्रभावी ठरते. 


चिया सीड्स


जेव्हा चिया बिया भिजवल्या जातात तेव्हा त्यातील प्रथिने, ओमेगा -3 आणि फायबरचे प्रमाण वाढते. जर तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड हृदयासाठी फायदेशीर आहेत.