Benefits of Eating Green Coriander: हिरवी कोथिंबीर अनेकांना खायला आवडते. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. अनेकांना कोथिंबीर वडी देखील खायला आवडते. कोथिंबीर ताजी राण्यासाठी अनेक लोक ती फ्रिजमध्ये ठेवतात. पण कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर 3-4 दिवसाने खराब होते. कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी ही सोपी ट्रिक तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता. या सोप्या पद्धतीमुळे कोथिंबीर 1 -2 आठवडे ताजी राहते. 


कोथिंबीर स्टोर करण्याची सोपी पद्धत
-जेव्हा तुम्ही कोथिंबीर बाजारामधून आणता, तेव्हा त्याची पाने तोडून कोथिंबीर निवडावी. अशाने कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहते.   
-कोथिंबीर निवडून झाल्यावर एका कंटेनर घ्या. त्या कंटेनरमध्ये थोडे पाणी घाला. त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळदीची पावडर टाका. या पाण्यामध्ये निवडलेली कोथिंबीरीची पाने भिजवा. 
-कोथिंबीर त्या पाण्यामधून धूवून काढल्यावर ती सुकवून घ्यावी. 
-त्यानंतर कोथिंबीरची पाने पेपर टॉव्हेलमध्ये  स्वच्छ करून घ्यावी.  स्वच्छ करताना कोथिंबीरीमध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. 
-दुसऱ्या कंटेनरमध्ये पेपर टॉव्हेल ठेवावा. त्यानंतर स्वच्छ केलेल्या कोथिंबीरीला त्या कंटेनरमध्ये ठेवावे आणि वरून आणखी एका टॉव्हेलने कोथिंबीर झाकावी.    
- हा कंटेनर कंटेनर कोरड्या जागी ठेवावा.
-कंटेनर चांगल्या प्रकारे एअर टाइट करावा. 
-कंटेनरमध्ये ठेवलेली ही कोथिंबीर एक ते दोन आठवडे फ्रेश राहाते. 


खराब जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका दुप्पट, पाचपैकी एक महिला रूमेटाइड आर्थरायटिसनं पीडित


Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? आहारात करा 'या' पिठांच्या भाकऱ्यांचा समावेश


कोथिंबीरीचे फायदे
-डायबिटीज असणाऱ्यांसाठी कोथिंबीर अतिशय फायदेशिर आहे. 
-कोथिंबीरीमुळे पचन क्रिया सुधारते
-कोथिंबीरीमुळे  शरिरातील  कोलेस्ट्रॉल कमी राहते. 


कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक असतात. कोथिंबीरची फक्त पानंच नव्हे तर धणे आणि पावडरसुद्धा अनेक आजार बरे करण्यास उपयुक्त आहे.


Health Care Tips : 'हे' पदार्थ एकत्र खाणं शरीरासाठी अपायकारक; पोटाच्या समस्या उद्भवण्याचा धोका


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम