Things That Harm Digestion:   अनेकांना जेवणासोबत वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते. तसेच अनेक वेळा लोक काही पदार्थ एकत्र करून खातात. आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकत्र खाऊ नयेत.  वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसेच  पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.  पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.  


दूधासोबत हे खाऊ नका
उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि मूळा खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच अंडी, मास आणि पनीर खाल्ल्यानंतर देखील दूध पिणे टाळावे. 


दही खाल्ल्यानंतर खाऊ नका या गोष्टी
दह्यासोबत आंबट फळ खाऊ नयेत, कारण दही आणि फळांमध्ये वेगवेगळे एंझाइम्स असतात. त्यामुळे ते एकत्र पचत नाहीत. त्यामुळे दही आणि अंबट फळे एकत्र खाऊ नयेत. तसेच दह्यासोबत माशे खाऊ नयेत कारण मशामध्ये उष्णता असते. 


Health Care Tips: फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी उपयुक्त; जाणून घ्या फायदे


मधासोबत या गोष्टी खाऊ नयेत
मधाला गरम करून खाणे किंवा गरम पाण्यात टाकून पिणे टाळावे. तसेच ताप असताना मध खाणे टाळा कारण त्यामुळे पित्त होऊ शकते. मध आणि लोणी एकत्र मिक्स करून खाऊ नयेत. तसेच मध आणि तूप देखील एकत्र खाऊ नये. 


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम


या गोष्टी एकत्र खाऊ नये
थंड पाण्यात तूप टाकून पिणे टाळावे. तसेच जांभूळ आणि शेंगदाणे कधीच एकत्र खाऊ नयेत. 


Skin Care Tips : फेशियल केल्यानंतर 'या' 5 गोष्टी टाळा; होईल त्वचेचं नुकसान


टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 


कोरफड एक फायदे अनेक, आपल्या घरात असलेल्या कोरफडीचे फायदेच फायदे, जाणून घ्या