Weight Loss Tips: अनेक लोक वजन कमी करण्यासाठी भात, भाकरी किंवा पोळी खाणे बंद करतात. काही लोकांचे असे मतं असते की, कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी केल्याने वजन कमी होते. पण तुम्हाला माहित आहे का, भाकरी खाऊन देखील तुम्ही वजन कमी करू शकता. जाणून घेऊयात कोणत्या प्रकारची  भाकरी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

  


बाजरीच्या पिठाची भाकरी  
थंडीमध्ये अनेक जण बाजरीची भाकरी खातात. बाजरीची भाकरी हा ट्रेडिशनल ग्लूटेन फ्री फूडचा प्रकार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, फास्फोरस, मॅग्नीशियम आणि लोह असते. बाजरीची भाकरी खाल्लाने तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. तुम्ही बाजरीच्या पिठामध्ये गव्हाचे पिठ देखील मिक्स करू शकता. 


नाचणीच्या पिठाची भाकरी 
नाचणीच्या पिठामध्ये मोठ्या प्रामाणात  फायबर आणि अमीनो  अॅसिड असते. नाचणीच्या पिठामध्ये पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होऊ शकते. 


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम


ज्वारीचे पिठाची भाकरी 
ज्वारीचे पिठ हे ग्लूटन फ्रि असते. तसेच या पिठामध्ये प्रोटीन, डायट्री फायबर, कॅल्शियम, लोह , फास्फोरस, व्हिटामिन बी आणि व्हिटामिन सी असते. ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने शुगर लेव्हल कंट्रोल होते.


Navratri Special: सारखे तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला? ट्राय करा या टेस्टी डिशेस


ओट्सची भाकरी 
वजन कमी करण्यासाठी ओट्स चांगले असते. ओट्स दररोज खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. ओट्समध्ये असणाऱ्या   अॅंटीऑक्सीडेंट हे ह्रदयासाठी चांगले असतात.


Shehnaaz Gill चं आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन, मूग डाळ आणि रोटी खाऊन वजन घटवलं! पंजाबच्या Katrina चा Fitness फंडा


टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.