Copper Utensils In Winter : तांब्याची भांडी (Copper Utensils) वापरण्याचा संबंध अनेकदा आरोग्याशी असतो. तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत असे आपण घरात नेहमीच ऐकले असेल. मात्र, हिवाळ्यात तांब्याचा वापर करणे कितपत योग्य आहे याबाबत तुम्हाला माहित आहे का? याचं उत्तर आयुर्वेदात स्पष्टपणे दिलेले आहे.
खरंतर आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात थंडीमुळे होणारे अनेक आजार दूर होतात. पाण्याचा प्रभाव गरम आहे. तसेच, संसर्ग दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच हिवाळ्यात तांब्याची भांडी वापरावीत. याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.
सांधेदुखीत फायदेशीर : हिवाळ्यात प्रत्येकाला ज्या समस्येला सामोरे जावे लागते ती म्हणजे हाडे आणि सांधेदुखी. अशा स्थितीत तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने हा त्रास दूर होतो. तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे, ते वेदना कमी करण्यास मदत करतात.
सांधेदुखीमध्ये फायदेशीर : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रासही खूप होतो. अशावेळी सांधेदुखीच्या रुग्णाने सकाळी लवकर तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. यामुळे सांधेदुखीत आराम मिळतो. रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते आणि शरीराची अनेक रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
लोहाची कमतरता दूर : तांब्याच्या भांड्यात अन्न किंवा पिण्याचे पाणी घेतल्याने लोहाचे शोषण आणि पेशी तयार होण्यास मदत होते.
हृदयाच्या समस्या दूर : तांब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. असे गुणधर्म त्यात आढळतात, म्हणूनच हृदयविकार बरा करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे.
त्वचेसाठी फायदेशीर : तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात मेलेनिन तयार होण्यास सुरुवात होते. याशिवाय तांब्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा वरचा थर आणखी चांगला होतो.
पचनक्रिया निरोगी ठेवा : तांब्याच्या भांड्याच्या वापराने तुमची पचनक्रिया देखील सुधारते, कारण तांबे बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात. पोट साफ करण्याचे काम करते.
तांब्याच्या भांड्यातून 'हे' पदार्थ खाऊ नयेत
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. याबरोबरच आंबट वस्तू किंवा आंबट फळांचा रस पिऊ नये. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :