International Yoga Day 2023 : योगा करणे शरीरासाठी किती आवश्यक आहे. त्याचा आरोग्याला काय फायदा होऊ शकतो. या सगळ्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. योग आपल्या रोजच्या लाईफस्टाइलचा फार महत्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य आणि वजनाच्या बाबतीत योगा ही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. योगा केल्याने ताणतणाव दूर होण्यास मदत होते. मात्र बऱ्याच लोकांना योगासनांबद्दल कमी माहीती आहे. म्हणूनच याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरीता 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. दरवर्षी लोक एका विशिष्ट ठिकाणी एकत्र होऊन योगा करतात. योगाचा उल्लेख हा भारतीय संस्कृतीत असणाऱ्या ऋग्वेदात देखील केला आहे. 


काय आहे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा इतिहास? (History of International Yoga Din)


27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भाषण करताना पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. संयुक्त राष्ट्र महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केले की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाईल. 


यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिन मनुष्याच्या थीमवर आधारित (Humanity International Yoga Day 2023 Theme)


आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे एकमेव उद्दिष्ट आहे कि योगा करणे रोजच्या आयुष्यात किती महत्वाचे हे लोकांपर्यंत पोहोचवणे. या वर्षीच्या योगा दिनची थीम ही मानवता (Humanity) अशी आहे. 


मागील काही वर्षात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या थिम्स 


आंतरराष्ट्रीय योगा दिन 2022 यावेळी सर्वांनी मिळून योगा ही थीम (Theme) करण्यात आली होती. तर 2021 मध्ये कल्याणासाठी योग असे होते.  2020 मध्ये घरी आणि परिवारासोबत योग अशी थीम करण्यात आली होती. 2019 आणि 2018 या वर्षात हृदयाकरीता योग , शांततेसाठी योग अशी थीम करण्यात आली होती. 2017 ची थीम "आरोग्यसाठी योग" होती. 2016 ची थीम “कनेक्ट द यूथ” होती. तर आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 ची थीम "योगा फॉर हार्मनी अँड पीस" होती.


या नवव्या योग दिनानिमित्त फॅमिलीमध्ये तसेच आजूबाजूच्या लोकांना तुम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हाॅट्सअॅपच्या मदतीने योगाबद्दल जागरूकता पसरवू शकता. 


. योग केल्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 


. योग केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. 


. श्वसन प्रक्रिया सुधारते आणि नियमीत योगा केल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळण्यास मदत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Shravan : यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार असणार, जाणून घ्या पहिला सोमवार कधी