Fukrey 3 Release Date : 'फुकरे' (Fukrey) या मल्टीस्टार सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या सिनेमाचा तिसरा भाग 'फुकरे 3' (Fukrey 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फुकरे' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

'फुकरे 3' हा सिनेमा आधी 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या भागाची म्हणजेच 'फुकरे 3'ची घोषणा करत रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. 'फुकरे 3' या सिनेमात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मंजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. 

'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'फुकरे 3' 

'फुकरे' हा सिनेमा 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'फुकरे रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या दोन्ही सिनेमानंतर या सिनेमाचा तिसरा भाग अर्थात 'फुकरे 3'ची घोषणा करण्यात आली. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी 'फुकरे 3' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  

'जवान'मुळे बदलली 'फुकरे 3'ची रिलीज डेट (Fukrey 3 Release Date)

'फुकरे 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मृगदीप लांबाने सांभाळली आहे. तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या सिनेमाची निर्मिती करत आहे. 'फुकरे 3' आधी 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

'फुकरे' या सिनेमाची गोष्ट चार मित्रांची आहे. 2013 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आता 'फुकरे 3' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकत्र प्रेक्षकांना 'फुकरे'ची गंमत पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये झळकणार शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक; छोट्या भाईजानचा व्हिडीओ व्हायरल